तिरुपती - भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आंध्र प्रदेशच्या दौ-यावर आहेत. तिरुपती येथे त्यांनी सांगितले की, माझ्या विरोधात आयुष्यात पहिल्यांदाच गुन्हा दाखल झाला. मी चाकू, बंदुकीचा धाक दाखवला नाही, तर कमळाचे फूल दाखवल्याने एफआयआर दाखल केली. यानंतर त्यांनी गुरुवारी प्रथम प्रसिद्ध भगवान व्यंकटेश्वर मंदिरात पूजा-अर्चा केली. ‘तेदेपा’चे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू यांच्याशिवाय जनसेनाचे संस्थापक आणि चिरंजीवीचे भाऊ पवन कल्याण देखील त्यांच्या सोबत उपस्थित होते. ते 20 मिनिटे मंदिरात होते. त्यांनी या वेळी आंध्र प्रदेशात 5 सभा घेतल्या.
आई-मुलामुळे देशात घोटाळे
आई-मुलाच्या सरकारने घोटाळ्यांचा देश बनवला आहे. आता देशाला ‘योजनांचा भारत’ बनवायचा आहे. त्यात लोकांसाठी कल्याणकारी व विकास योजना असतील.
कॉँग्रेस सरकारने संधी मिळाली, तेव्हा तेलगू बांधवांचा अपमान केला. त्यांनी सिमांध्र- तेलंगणा बनवला. मात्र, येथील नागरिकांना विश्वासात घेतले नाही.
आयुष्यभरात माझ्याविरुद्ध एकही एफआयआर दाखल झालेली नाही. एवढेच नाही तर रस्त्यावर विरुद्ध दिशेने वाहन चालवणे अथवा चुकीच्या पद्धतीने पार्किंगही केलेली नाही. माझ्याविरुद्ध एफआयआर दाखल झाल्याचे मला नंतर कळाले. मी 30 एप्रिल हा दिवस कधीही विसरणार नाही. चाकू, पिस्तूल अथवा बंदूक दाखवली असती तर ते समजू शकतो. परंतु कमळ दाखविल्याने माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.