नवी दिल्ली- माझे वडील राजीव गांधी आहे. त्यांची कोणत्याही व्यक्तीसोबत तुलना केली जाऊ शकत नाही, असे स्पष्टीकरण प्रियंका गांधी यांनी दिले आहे.
यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदींवर शाब्दिक हल्ला चढवला. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले, की नरेंद्र मोदी प्रियंका गांधी यांना आपल्या मुलीसारखे मानतात, याचा मला आनंद आहे. परंतु, प्रियंका त्यांना वडीलांच्या रुपाने बघू शकेल, असे मला वाटत नाही. नरेंद्र मोदी यांना भारतीय अर्थव्यवस्थेचे जेवढे ज्ञान आहे ते केवळ एका पोस्टकार्डाच्या मागच्या बाजूने लिहले जाऊ शकते.
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत प्रियंका गांधी मला मुलीसारखी आहे, असे वक्तव्य केले होते. त्यामुळेच मी प्रियंकाबाबत काही बोलत नाही, असेही ते म्हणाले होते.
प्रियंका अमेठीत राहुल यांचा प्रचार करत होत्या. त्या वेळी पत्रकारांनी त्यांना मोदींच्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारला. त्यावर प्रियंका म्हणाल्या, ‘20 वर्षांपूर्वी माझ्या वडिलांनी या देशासाठी प्राण अर्पण केले. ते माझे जगातील सर्वात आवडते व्यक्ती होते. त्यांची कोणत्याही व्यक्तीसोबत तुलना करणे मला आवडणार नाही.’ तत्पूर्वी मोदी यांच्या वक्तव्याबाबत चिदंबरम यांनाही प्रश्न विचारण्यात आला होता. चिदंबरम म्हणाले की, मोदी प्रियंका यांना मुलीसारखे मानतात हे ऐकून मी खुश आहे; पण त्या (प्रियंका) मोदी यांना पित्यासमान मानून खुश होतील की नाही, हे मला सांगता येणार नाही. दरम्यान, या वक्तव्यावर भाजपनेही पलटवार केला आहे. निर्मला सीतारमण म्हणाल्या की, मोदी जे म्हणाले ते भारतीय संस्कृतीला धरून आहे.
कोणतीही सूचना न देता केले गेले मुलाखतीचे प्रसारण... वाचा पुढील स्लाईडवर