आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi News In Marathi, BJP, Rajiv Gandhi, Sonia Gandhi, Divya Marathi

सुडाचे राजकारण राजीव-सोनियांकडूनच - नरेंद्र मोदी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रुद्रपूर - नरेंद्र मोदी शनिवारी उत्तराखंडमध्ये होते. रुद्रपूरमध्ये ते म्हणाले, सुडाचे राजकारण काँग्रेस आणि स्वत: राहुल यांचे वडील आणि आई अर्थात राजीव व सोनियाच करत आले आहेत.
केसरींना फुटपाथवर फेकले होते
सीताराम केसरी काँग्रेसचे अध्यक्ष होते. परंतु सोनिया गांधी यांना अध्यक्ष बनवण्यासाठी सोनियांच्या शिपायांनी सीताराम केसरी यांना उचलून कार्यालयाबाहेर फुटपाथवर फेकले होते. आता त्यांनी (राहुल) सांगावे की, सूड आणि तिरस्काराचे राजकारण कोण करत आहे.

उत्तराखंडचे सरकार अपयशी
जेव्हा उत्तराखंड आपत्तीची माहिती मिळाली तेव्हा मी बेचैन झालो. मी पीडितांना भेटू इच्छित होतो. मला काही तरी करण्याची इच्छा होती. मी पळत आलो, परंतु राजकारणामुळे मला काहीच करू दिले गेले नाही. मला नेहमीच या गोष्टीचे दु:ख राहील. उत्तराखंडचे सरकार आपत्तीचा मुकाबला करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. नवी दिल्लीत बसलेले आई-मुलाचे सरकारदेखील त्यात सहभागी आहे.
राहुलभय्या म्हणतात, आम्ही संतापाचे राजकारण करतो. मी आज या पुण्यभूमीत सुडाचे राजकारण कोण करतो, हे सांगणार आहे. राजीव गांधी काँग्रेसचे सरचिटणीस होते, तेव्हा त्यांनी शेकडो लोकांसमक्ष आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान केला होता. तेव्हा सीएमना विमानतळावरच रडू कोसळले होते. लोकशाही प्रणालीतून निवडून आलेल्या व्यक्तीचा अपमान करण्याचा अधिकार राजीव गांधी यांना कोणी दिला होता?

आई-मुलावर परिणाम नाही
आई-मुलाने देशाचे नुकसान केले आहे. दु:ख याचेच वाटते की, याचा थोडाही परिणाम त्यांच्यावर दिसून येत नाही. त्यांचे गृहमंत्री (सुशीलकुमार शिंदे) म्हणतात, लोक बोफोर्स (घोटाळा) विसरले आहेत, उर्वरित सगळ्या गोष्टीही (महागाई आणि भ्रष्टाचार) विसरल्या जातील. तुम्हाला आपल्या देशातून लुटलेला पैसा परदेशातून आणायचा असेल तर दिल्लीतील लुटारूंच्या सरकारला हटवावे लागेल.

तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले, गरिबी न पाहिलेले आई-मुलाच्या सरकारमध्ये आहेत. त्यांना गरिबीचे चटके ठाऊक नाहीत. यंदा एका बाजूला नामदार, तर दुस-या बाजूला कामावर निष्ठा असलेले आहेत.

काशीमध्ये मोदींसाठी एनडीए नेत्यांची एकजूट
नरेंद्र मोदी यांच्यासाठी वाराणसीमध्ये 10 मे रोजी एनडीए नेत्यांचा ताफाच प्रचार फेरीत एकवटला जाणार आहे. 12 मे रोजी मतदान होणार आहे. एनडीएतील सर्व घटकपक्षांच्या प्रमुख नेत्यांना एका व्यासपीठावर आणून मोठा राजकीय संदेश देण्याचा भाजपचा उद्देश आहे. भाजप या सभेच्या माध्यमातून पूर्वांचलमधील सुमारे 20 जागांशिवाय शेजारील बिहारच्या सर्व जागांवर प्रभाव टाकू इच्छितो. सभेला राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांच्याशिवाय ज्येष्ठ नेते प्रकाशसिंग बादल आणि चंद्राबाबू नायडू देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.