लखनऊ - नरेंद्र मोदींनी शुक्रवारी उत्तर प्रदेशात प्रचारसभा घेतल्या. खलिलाबाद आणि बस्ती येथे त्यांच्या सभा झाल्या. अमेरिकेशी मुकाबला करू शकेल, असा भारत आपल्याला हवा आहे, असे ते म्हणाले. त्याचबरोबर सोनिया गांधींवरही टीका केली. हे देवा, अशा (गुजरात) मॉडेलपासून देशाला वाचव, असे सोनिया म्हणाल्या होत्या.
सपा-बसपची दुकानदारी
दिल्लीत जाऊन पाठिंबा देणे हे एकमेव काम सपा-बसपने केले आहे. आपली दुकानदारी केली. ही नुरा कुस्ती आहे. हे सगळे मोदींना रोखण्याच्या गप्पा करतात.
काँग्रेसने केले स्कॅम इंडिया
काँग्रेसने आपल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात एकापेक्षा एक वरचढ स्कॅम (घोटाळे) केले. पाणी, जमीन आणि आकाशातही त्यांनी लूट केली. त्यांनी देशाला स्कॅम इंडिया बनवले.
16 ला मोदी आला तर या लोकांचा ठावठिकाणा सापडणार नाही. त्यामुळेच सगळे घाबरले आहेत. चहा बनवणा-याने सगळ्यांची झोप उडवली आहे. दिल्लीतील माँ-बेटा सरकारला उत्तर प्रदेशातील बाप-बेट्याचे सरक ारही वाचवू शकणार नाही. त्यामुळेच मॅडम सोनिया वारंवार देवाचा धावा करीत आहेत. यापूर्वी कधी नावही घेत नव्हत्या.
मोदी समस्येचे उत्तर काय याचा विचार करतात
रोजगाराचे काय होईल ? शेतक-याला कसे वाचवावे ? गुंडगिरी कशी थांबवावी ? पाण्याची समस्याही आहेच. या सगळ्या मुद्द्यांवर काय तोडगा काढावा याचा सतत विचार मी करीत असतो. परंतु हे सर्व विरोधक मोदी प्रश्नाचे उत्तर काय आहे हे शोधत आहेत.
मी बेकारी, गुंडगिरी संपवण्याची भाषा करतो त्या वेळी हे धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा उक रून काढतात. काँग्रेस खुर्चीसाठी, तर आम्ही तुमच्या कल्याणासाठी लढत आहोत. आम्ही वीज-पाण्याची समस्या सोडवू.