आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Gandhi News In Marathi, Congress, Divya Marathi, Lok Sabha Election

अदानींना हे ही विचारा- त्यांनी रोजगाराच्या किती संधी दिल्या, राहुल यांचा मोदींना सवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलन - कॉँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी हिमाचल प्रदेशात सभा घेतली. त्यांनी सोलनमध्ये सांगितले की, जर भारतीय जनता पक्षाची सरकार आली तर देशातील शांततेला धोका निर्माण होईल. भाजप सत्तेत आली तर 22 हजार व्यक्ती मारल्या जातील. भाजपकडून नकारात्मक राजकारण सुरू आहे.

देशात आधीपासूनच सुरू आहे, ‘वन रँक-वन पेन्शन’
भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात वन रॅँक-वन पेन्शनचा उल्लेख वाचून आश्चर्य वाटले. देशात आधीपासूनच वन रॅँक-वन पेन्शन सुरू आहे. यासाठी भारत सरकारने गरजे इतक्या निधीचीही व्यवस्थादेखील केली आहे.

मोदी संघाच्या विचारसरणीचे प्रतिनिधीत्व करतात. संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजींचे मत होते की, भारताने महिलांना मतदानाचा अधिकार देऊन चूक केली. मोदींनी सरदार पटेल यांचाही अभ्यास व्यवस्थित केला नाही.

मोदींनी विकले शेतक -यांचे हक्क भाजप गुजरात मॉडेलचा प्रचार करीत आहे. परंतु नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना अदाणी यांना गुजरातच्या शेतक-यांचे हक्क विकले हे सत्य आहे. या गुजरात मॉडेलचा तेथील जनतेला एक पैशाचाही फायदा झालेला नाही.

एक व्यावसायिक प्रतिष्ठानने(अदाणी समूह) गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात 40,000 कोटी रुपये नफा कमावला. तुम्ही त्या व्यावसायिकास विचारा की, त्यांनी किती रोजगाराच्या संधी दिल्या.