आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ANALYSIS: राहुल ABSENT, प्रियंका PRESENT, वाचा अमेठीचा लेखाजोखा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तर प्रदेशातील अमेठी आणि रायबरेली कॉंग्रेसचे पारंपरिक मतदारसंघ राहिले आहेत. गेल्या पन्नास वर्षांचा विचार केला तर येथून कॉंग्रेसचे दिग्गज लढले आणि मोठ्या फरकाने जिंकून आले. गांधी-नेहरू कुटुंबाचा या मतदारसंघात दबदबा राहिला आहे. परंतु, यावेळची लोकसभा निवडणूक ऐतिहासीक राहिल असे सांगितले जात आहे. जरा वेगळी हवा अमेठी मतदारसंघात दिसून येत आहे. राहुल गांधी यांची अमेठीतील राजकीय स्थिती चिंताजनक असून त्यांच्या मताधिक्यात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे प्रियंका गांधी पुढे सरसावली असून अमेठीची लढाई कॉंग्रेसला सहज शक्य होणार नसल्याचे दिसून येत आहे.
1977-80 मध्ये रविंद्र प्रताप सिंह जनता पक्षाच्या तिकीटावर अमेठीतून निवडून आले होते. त्यानंतर 1998-99 मध्ये संजयसिंह भाजपच्या तिकीटावर या मतदारसंघातून विजयी झाले होते. या व्यतिरिक्त इतर निवडणुकांमध्ये कॉंग्रेसचे उमेदवार येथून मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. 2009 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी तब्बल 71.78 टक्के मते घेऊन निवडून आले. यावेळी त्यांना तब्बल 4,64,195 मते पडली होती. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी आशिष शुक्ला यांना केवळ एकूण मतांच्या 14.54 टक्के म्हणजेच 93,997 मते पडली होती.
परंतु, यावेळी अमेठीतील परिस्थिती बदलली आहे. राहुल गांधी यांच्यासमोर भाजपच्या उमेदवार स्मृती ईराणी आणि आम आदमी पक्षाचे उमेदवार कुमार विश्वास यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. याशिवाय बहुजन समाजवादी पक्षाचे धर्मेंद्र प्रतापसिंह निवडणूक रिंगणात आहेत.
राहुल गांधी या मतदारसंघात कमकुवत पडू शकतात, असे वृत्त न्युयॉर्क टाईम्स या प्रतिष्ठित दैनिकाने दिले आहे. यावरून या मतदारसंघातील मतदारांचा वेगळा मुड अधोरेखित झाला आहे.
का आहेत राहुल गांधी संकटात, वाचा पुढील स्लाईडवर.....