आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ncp Supremo Sharad Pawar Retired From Active Politics

सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याचा शरद पवारांनी जाहीर केला निर्णय!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- मी आतापर्यंत सात लोकसभा आणि सात विधानसभेच्या निवडणुका लढवल्या. एकही ठिकाणी पराभव झाला नाही. प्रामाणिकपणे जनतेची कामे केली. मात्र, यापुढे सत्तेतील कोणतेही पदे स्वीकारणार नाही. राष्ट्रवादी पक्षामध्ये राज्याचे नेतृत्त्व करण्याची क्षमता असल्यामुळे आम्हाला बहुमत मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केला.

विधानसभेच्या प्रचारानिमित्त पवार सोलापुरात आले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पवार म्हणाले, राष्ट्रवादी पक्षच राज्याचे नेतृत्त्व करू शकतो. राष्ट्रवादीच्या चार ते पाच नेत्यांमध्ये राज्याची नेतृत्व करण्याची क्षमता आहे. महाराष्ट्र राज्य सुरुवातीपासूनच देशात अग्रेसर राहिले आहे. तरीही राज्यात शेती आणि औद्योगिकीकरण वाढणे गरजेचे आहे. केंद्राचे शेतीकडे दुर्लक्ष होत आहे. एका राज्याचा विकास करताना दुसऱ्या राज्यातील उद्योग, डायमंड बाजारपेठ पळवणे योग्य नाही, असे टोलाही त्यांनी कोणाचेही नाव घेता लगावला. या वेळी खासदार विजयसिंह मोहिते, महेश गादेकर, मनोहर सपाटे, आमदार दीपक साळुंके, विद्या लोलगे, दिनेश शिंदे आदी उपस्थित होते.
गुजरातविरुद्ध वातावरण- मुंबईवर हल्ला करणारे अतिरेकी सागरी मार्गाने आले. अतिरेकी सागरी मार्गाने येऊ नयेत म्हणून पोलिसांना प्रशिक्षण देण्यासाठी राज्यात केंद्र उभे करण्याचा प्रयत्न आहे. मात्र, हे केंद्र गुजरातमध्ये नेण्याचा प्रयत्न होतोय. आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ मुंबईत असून, येथील बाजारपेठ गुजरातमध्ये नेण्याचा प्रयत्न होतोय. अशा पळवापळवीच्या धोरणामुळे गुजरात विरुद्ध महाराष्ट्र असे वातावरणनिर्मिती होत आहे.
विचार लादण्याचा प्रयत्न- भाजपचे सरकार आल्यावर त्यांचा आणि आरएसएसचा विचार लादण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. दसऱ्या दिवशी नागपुरातील संघाचे थेट प्रसारण दाखवले. त्या दिवशी नागपुरात धम्मचक्र प्रवर्तनदिनाचा कार्यक्रम होता. त्याचे थेट प्रसारण दूरदर्शनवर का दाखवले नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राज्यासाठी सभा घेणारे पंतप्रधान- राज्यात आघाडी व्हावी म्हणून दोन महिन्यांपूर्वी मी सोनिया गांधी यांना भेटलो होतो. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मात्र, राज्यातील नेत्यांचा आघाडीला विरोध होता. त्यामुळे आघाडी तुटली. 144 जागेची मागणी करून त्यानुसार तयारी केली. ऐनवेळी 288 जागा लढणे अवघड आहे. राज्यात काही ठिकाणी आमची लढत भाजप, शिवसेना, काँग्रेस सोबत आहे. राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीत देशाचा पंतप्रधान 35 सभा घेत असल्याचे चित्र मी प्रथमच पाहतोय. यामुळे पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा कमी होत आहे. मी व्यक्तिगत पातळीवर टीका करत नाही. पण कोणी माझ्यावर टीका केल्यास त्यास प्रत्त्युतर देतो, असे पवार यावेळी म्हणाले.