राजकारण आणि समाजकरणाच्या माध्यमातून केवळ राज्य नव्हे केंद्रीय पातळीवर एक महाराष्ट्रीय नेता म्हणून पवार साहेब अर्थातच शरदचंद्र गोविंदराव पवार यांनी
आपला एक ठसा उमटवला आहे. कामातील व्यग्रता, सखोल नियोजन, शिस्तबद्ध दैनंदिनी, शांतपणा, विरोधकांचे आरोप-प्रत्यारोप पेलण्याची धीरोदात्त वृत्ती, मुत्सद्दीपणा अन् दूरदृष्टी या व्यक्तीमत्त्व गुणांच्या जोरावर पवार साहेबांना 'काटेवाडी ते मंत्रालय'हा मोठा पल्ला अल्पावधीत गाठता आला.
राज्यासह केंद्रात दबदबा निर्माण करणारा नेता म्हणून राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर पवार साहेबांचे नाव आवर्जुन घ्यावे लागेल. त्यामुळेच शरद पवारांच्या रुपात संपूर्ण महाराष्ट्रासह देशाने एक क्रीडाप्रेमी, आधुनिक नेता अनुभवासला आहे.
शरद पवार यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील 'काटेवाडी' या छोट्याशा गावात झाला. गोविंदराव आणि आई शारदाबाई या शेतकरी कुटुंबातील जन्मलेल्या शरद पवार (12डिसेंबर 1940) यांना राजकारण आणि समाजकारणाचे बाळकडू शारदाबाई पवार यांच्याकडून मिळाले.शारदाबाई पवार या स्वातंत्र्यपूर्व काळात पुणे जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात कार्यरत होत्या. गोविंदाराव हेदेखील सहकारी चळवळीतील निष्ठावंत कार्यंकर्ते होते. तसेच त्यांचे बंधू वसंतराव शेतकरी कामगार पक्षात होते. अशा कुटुंबात पवारांची लहानपणापासूनच राजकीय-सामाजिक कार्याची जडणघडण झाली. त्यामुळेच शरद पवार यांचा 'कॉलेज जीएस (जनरल सेक्रेटरी)ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व विविध खात्यांचे केंद्रीय मंत्री' हा खडतर प्रवास थक्क करणारा तर आहेच या शिवाय कार्यकर्त्यांसाठी प्रेरणा देणारा आहे.
बारामती येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयात शरद पवार यांचे शालेय शिक्षण झाले. पुढे पुण्यातील बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय शिक्षण घेतानाही त्यांनी जनरल सेक्रेटरी (जी.एस) म्हणून महाविद्यालयीन व विद्यापीठ स्तरावर नेतृत्त्व केले. या काळात शरद पवार यांचा युवक कॉंग्रेसशी संबंध आला आणि तेथून त्यांनी पक्षीय राजकारणात प्रवेश केला.
पवार साहेबांचा राजकीय प्रवास सर्वश्रुत आहे. परंतु, त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल सर्वसामान्यांना फार माहित नाही. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही आपल्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची यांच्या जीवनप्रवासाविषयी माहिती देत आहोत.
पुढील स्लाइड्सवर वाचा, प्रतिभेच्या जोडीने 'प्रतिभा'वान झालेले शरद पवार...