आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अजित पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल, भाजपसोबत जाणार नसल्याचे केले स्पष्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती (पुणे) - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी बारामती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे होत्या. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित प्रचारसभेत त्यांनी स्थिर सरकारसाठी राष्ट्रवादीच्या पाठीशी उभे राहाण्याचे आवाहन केले. त्यासोबतच एकहाती सत्ता आली नाही, तर समविचारी, पुरोगामी पक्षासोबत आघाडी करण्याचे जाहीर करुन पुन्हा काँग्रेसचा 'हात' धरण्याचे संकेत दिले. त्याचबरोबर भाजपसोबत जाणार नसल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले.

अजित पवारांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून अर्ज भरल्यानंतर कन्हेरी येथील सभेत भ्रष्टाचाराविषयी चीड व्यक्त केली. राज्यात पुन्हा सत्ता आल्यास एक रुपयाचाही भ्रष्टाचार होऊ देणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला. अजित पवारांवर भ्रष्टाचाराचा आरोप झाला, होता त्यावर ते म्हणाले, माझ्यावर अनेक बिनबुडाचे आरोप झाले. त्यावर मी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली, आणि चौकशी होईपर्यंत सत्ते बाहेर राहिलो. राजीनामा दिला. श्वेतपत्रिकेतून आम्ही कोणताही गैरकारभार केला नसल्याचे स्पष्ट झाले, तरीही विरोधक साप-साप म्हणत भूई धोपटत राहिले.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, अजित पवारांचे शक्तीप्रदर्शन