आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Brife Information Of Congress Leader Narayan Rane

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाळासाहेबांचे विश्वासू ते सोनिया गांधींचे शिलेदार, वाचा नारायण राणेंचा राजकीय प्रवास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्रचे उद्योगमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी काँग्रेसला नेहमीच अडचणीत आणले आहे. राणे कायम मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत राहिले आहेत. विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधी त्यांनी बंडाचे निशाण उभारले होते. मात्र, काँग्रेस श्रेष्ठींनी त्याकडे फारसे लक्ष न दिल्याने बंड थंड झाले. मात्र, राज्यातील प्रचाराची धुरा आपल्याकडे राखण्यात त्यांना यश आले. त्यांच्या पी. एचडी धारक मुलाला नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत कोकणी माणसाने झटका दिला. हा घाव त्यांच्या वर्मी लागला. मात्र, या पराभवाचे दुःख करत न बसता राणे पुन्हा कामाला लागले आणि त्यांनी विधानसभेची तयारी सुरु केली आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मिळालेल्या मुख्यमंत्रीपदापासून काँग्रेसच्या राजवटीत त्यांच्याकडे राज्यमंत्रिमंडळात अनेक खाती राहिली आहेत. हे सर्वज्ञात आहे. त्यांच्या या प्रवासाचा लेखा-जोखा, कौटुंबीक आयुष्य, व्यक्तीमत्त्वाची जडणघडण आणि बरेच काही... वाचा पुढील स्लाइडमध्ये...