आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Files Complaint Against PM Narendra Modi

श्रीनगरमध्ये मतदानाच्या एक दिवसआधी सभा, मोदींविरुद्ध आचारसंहिता भंग तक्रार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचारसंहितेचा भंग केला असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आला असून तशी तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. यात मोदींविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. मोदी यांनी सोमवारी श्रीनगरच्या शेर -ए-काश्मीर मैदाना सांबामध्ये निवडणूक प्रचारसभा घेतली. त्यानंतर एक दिवसांनीच म्हणजे मंगळवारी तेथे मतदान होणार होते. काँग्रेसच्या कायदे विभागाच्यावतीने आयोगाला पाठवण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की, आदर्श आचारसंहितेनुसार मतदानाच्या 48 तास आधी प्रचार बंद होतो. त्यानंतर जाहीर सभा घेता येत नाही. परंतु मोदींनी मात्र याचे पालन केलेले नाही. मोदींच्या या रॅलीचे संपूर्ण काश्मीरसह देशभरात प्रसारण करण्यात आले. हा आचारसंहिता भंग आहे.

त्यात त्यांनी जवानांसाठी उचललेली पावले यांचा उल्लेख केला आहे. हा आचारसंहितेचा भंग असून त्यासाठी मोदींव तसेच रॅली आयोजकांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

फोटो - भाजप उमेदवाराच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदी