आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Infiltrate In All Governments Narendra Modi

काँग्रेसची सर्व सरकारमध्ये घुसखोरी - नरेंद्र मोदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कठुआ - जम्मू-काश्मीरमध्ये नरेंद्र मोदी यांनी भाजपला नवीन पर्याय म्हणून जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसने राज्यातील आजवरच्या सर्व सरकारमध्ये घुसखोरी केली. नॅशनल कॉन्फरन्सचे सरकार असो की पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी)चे सर्व फायदे घेऊन निवडणुकीच्या तोंडावर बाहेर पडणे आणि नंतर आपल्याच सहका-यांना दोष देण्याची काँग्रेसची पद्धत आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
शनिवारी आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. राज्यात घराणेशाही आहे. घराणेशाहीचे राजकारण कधीही लोकशाहीचा खरा आवाज ठरू शकत नाही, असे मोदी म्हणाले. मुस्लिमबहुल राज्यात भाजपने निवडणुकीत जोर लावण्याची ही पहिलीच वेळ आहे.