आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभा 2014: जम्मू-काश्मीर आणि झारखंडमध्ये शेवटच्या टप्प्यासाठी मतदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू/रांची - जम्मू-काश्मिर आणि झारखंडमध्ये आज (शनिवार) विधानसभा निवडणुकीचे पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. दुपारी दोन पर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये 50 टक्के मतदान झाले.
झारखंडमधील 16 आणि जम्मू-काश्मिरातील 20 विधानसभा जागांसाठी मतदान सुरु आहे. झारखंडमध्ये 208 जम्मू-काश्मिरात 213 उमेदवार रिंगणात आहेत. झारखंडमध्ये सकाळी 9 पर्यंत साधाराण 14 टक्के मतदान झाले. दोन्ही राज्यातील मतमोजणी 23 डिसेंबरला होणार आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये 20 जागांवर मतदान सुरु
बनी, बसोहली, कठुआ, बिलावर,हीरानगर, नगरोटा, गांधीनगर, जम्मू पश्चिम, जम्मू पूर्व, बिश्नाह, आरएस पुरा, सुचेतगढड, मढ़, रायपुर दोमाना, अखनूर , छंब , नौशेरा, दरहाल, राजौरी आणि कालाकोट या मतदारसंघात आज शेवटच्या टप्प्यात मतदान होत आहे. यातील 5 मतदारसंघ कठुआ जिल्ह्यात, जम्मूमध्ये 11 आणि राजौरी जिल्ह्यातील 4 जागांवर मतदान होत आहे.

भाजपसमोर बालेकिल्ला वाचवण्याचे आव्हान
शनिवारी 20 जागांसाठी मतदान होत आहे. 2008 च्या निवडणुकीत यापैकी 10 जागा भाजपकडे होत्या. त्यामुळे त्यांचा हा बालेकिल्ला मानला जातो. या जागांवर पुन्हा विजयी होण्याचे भाजपसमोर आव्हान आहे. उर्वरित 10 जागांमध्ये काँग्रेसकडे पाच, नॅशनल कॉफ्रंस दोन आणि पीडीपीला एका जागेवर यश मिळाले होते. शिवाय दोन अपक्ष निवडून आले होते.