श्रीनगर- जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्याची राजकीय प्रतिष्ठापणाला लागली आहे. मतदारराजा कोणत्या पक्षाला बहुमत देतो, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. विशेष म्हणजे जम्मू-काश्मीरमध्ये पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांची जादू चालते की नाही, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
जम्मू- काश्मीर निवडणुकीत दिग्गजांसह काही नवखे चेहरे नशिब आजमावताना दिसत आहेत. जादिबल मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या नीलम गश या त्यापैकी एक आहेत. नीलम गश या पहिल्यांदा निवडणूक लढवत असून त्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. नीलम गश या सॉफ्टवेअर इंजीनिअर आहेत. गडगंज पगाराच्या नोकरीला रामराम ठोकून नीलम गश यांनी राजकारणात प्रवेश केला आहे.
नीलम गश या श्रीनगरच्या रहिवाशी असून त्या काश्मीरमधील जादिबल मतदार संघातून नशीब आजमावत आहेत. नीलम यांनी कॉम्प्युटर अॅप्लिकेशनमध्ये उच्चपदवी घेतली आहे.
गुडगावमधील एका सॉफ्टवेअर कंपनीत त्या नोकरी करत होत्या. मात्र, काश्मीरचा सर्वागिन विकास व्हावा, या मनिषेने त्यांना नोकरी सोडून लोकसेवेचे व्रत स्विकारले.
...तर काश्मीरमध्ये सुरु होईल बीपीओ आणि सॉफ्टवेअर कंपनी!
भाजपच्या उमेदवार नीलम गश सध्या प्रचारकार्यात व्यस्त आहे. विधानसभा निवडणुकीत विजय मिळाला तर काश्मीरमध्ये बीपीओ आणि सॉफ्टवेअर कंपनी सुरु करणार असल्याचे आश्वासन नीलम गश यांनी दिले आहे. काश्मीरमधील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचेही नीलम गश यांनी म्हटले आहे.
कॉंग्रेस आणि भाजपमध्ये काट्याची लढत...
जादिबल विधानसभा मतदार संघ हा अलगाववादी नेत्यांचा गड मानला जातो. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जादिबलमध्ये परिवर्तन होण्याची शक्यता आहे. नॅशनल कॉन्फ्रेन्स आणि पीडीपीने
आपापले उमेदवार रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे कॉंग्रेस आणि भाजपमध्ये काट्याचा लढत पाहायला मिळणार आहे. कॉंग्रेसने महिला उमेदवार शमीमा रैना यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे शमीमा रैना आणि नीलम गश यांच्यात प्रमुख लढत होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, भाजपच्या महिला उमेदवार नीलम गश यांचे निवडणूक प्रचाराचे PHOTOS...