आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Lal Krushna Adwani Not Happy After BJP Shivsena Alliance Breakup News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युती तोडण्याचा निर्णय 10 दिवसांपूर्वीचा, फडणवीसांना होती कल्पना; अडवाणी दु:खी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - शिवसेनेपासून फारकत घेण्याची सूत्रे गुरुवारी दुपारी अतिशय वेगाने दिल्लीतून हलली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेसाठी उड्डाण भरतील, तेव्हा मुंबईतून शिवसेनेपासून वेगळे होण्याची घोषणा करा, अशा सूचना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना दिल्या होत्या. मात्र, या निर्णयामुळे लालकृष्ण अडवाणी प्रचंड दु:खी झाले आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार युती तोडण्यासाठी भाजपने १० दिवसांपूर्वीच तयारी सुरू केली होती. संपूर्ण देशात मोदी लाट पाहता महाराष्ट्रात भाजपची एकहाती सत्ता असावी त्यात शिवसेनेचा हस्तक्षेप असू नये याची रणनीती ठरवण्यात येत होती. युती तुटली याची टीका आपल्यावर होऊ नये, याची सावधगिरीही केंद्रातील भाजपच्या नेत्यांकडून घेण्यात आली होती. शिवसेना आपला कोणताही फॉर्म्युला मान्य करणार नाही, असेच प्यादे भाजप समोर सरकवणार होते. दिल्लीतील उच्चस्तरीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युती तोडायची कल्पना २४ सप्टेंबर रोजी फडणवीस यांनाच देण्यात आली होती; परंतु त्यावर अंतिम निर्णय व्हायचा आहे, हेही सांगण्यात आले होते. परंतु या संपूर्ण घडामोडींवर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे प्रचंड नाराज झालेले आहेत.
शिवसेनेसोबत युती करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. बाळासाहेब ठाकरे आणि अडवाणी यांचे संबंध कायम उत्तम होते. भाजपचे नेते या वेळी शिवसेनेला सोबत घेणार नाहीत याची त्यांना आधीच शंका आली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अडवाणी यांना शिवसेना भाजपच्या सूत्राला जराही दाद देत नसल्याचे मागच्या आठवड्यात प्रत्यक्ष भेटीत कळवले होते. युती तुटण्याच्या कल्पनेने व्याकूळ झालेले अडवाणी यांनी स्वत: मातोश्रीवर फोन करून उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी उद्धव यांना एक पाऊल मागे घ्या, परंतु युती तुटेल असे कोणतेही पाऊल उचलू नका, असा सल्ला दिला होता. वाजपेयींच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी भाजपचे देशभर जाळे उभारले, त्या अडवाणी यांना मोदी आणि अमित शहा यांनी अलगद बाजूला केले आहे. अडवाणींना मार्गदर्शक केले असले तरी मोदी आणि शहा यांना त्यांच्या सल्ल्याची गरज वाटत नाही. त्यामुळे शिवसेनेला बाजूला करताना त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला नाही.
पुढील स्लाइडवर वाचा, गडकरी - मोदी चर्चा...