आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narayan Rane News In Marathi, Congress, Nationalist Congress, Divya Marathi

राणे समर्थक राजन तेलींच्या पक्षप्रवेशासाठी राष्‍ट्रवादीच्या लाल पायघड्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष बाळ भिसे यांचे भाऊ व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सत्यविजय भिसे यांच्या हत्याकांडातील प्रमुख आरोपी आणि आजवर नारायण राणे यांचे उजवे हात मानले जाणारे राजन तेली यांच्यासाठी पक्षप्रवेशाचा लाल गालिचा राष्ट्रवादीने अंथरल्याने राजकीय वर्तुळात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादीत एकच खळबळ माजली आहे.
भिसे यांच्या हत्येनंतर कोकणासह सारा महाराष्ट्र हादरला होता आणि राष्ट्रवादीच्या कार्यकत्यानी तेव्हा राणे यांचे कणकवलीतील घरही पेटवून दिले होते. या हत्येप्रकरणी काँग्रेसचे माजी आमदार राजन तेली आणि सहका-यांना सहा महिने तुरुंगाची िशक्षा भोगावी लागली.
काही महिन्यांनंतर हे आरोपी बाहेर आले आणि पुन्हा राजकारणात सक्रिय झाले. मात्र, बदलत्या राजकीय परिस्थितीत तेली काँग्रेसचे नेते व उद्योगमंत्री नारायण राणेंना सोडून राष्ट्रवादीत दाखल झाले आणि सोमवारी त्यांना अधिकृतपणे प्रवेश देण्यात आला.
कणकवलीजवळच्या िशवडाव गावी जाऊन सत्यिवजय िभसेंची हत्या झाली होती. या हत्येवेळी वापरण्यात आलेली गाडी तेलींची असल्याचे िसद्ध झाल्याने त्यांना काही महिने तुरुंगात काढावे लागले होते. तर प्रत्यक्ष हत्या करणारी माणसेही तेलींची असल्याचे आढळून आले. या हत्येमुळे कोकणातील नारायण राणे व त्यांच्या सहका-यांचा दहशतवाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता. श्रीधर नाईक, रमेश गोवेकर, अंकुश राणे या खून प्रकरणांची गडद िकनारही या दहशतवादाला मोठ्या प्रमाणावर कारणीभूत होता. सत्यविजय िभसेंच्या हत्येनंतर गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी कोकणात जाऊन दहशतवाद संपवून टाकण्याचा िनर्धार केला.
पण हा िनर्धार करून दहशतवाद तर संपला नाहीच, मात्र दहशत िनर्माण करणा-यांनाच राष्ट्रवादीत आमदारकीचे ितकीट देण्याचे ठरवले. या सा-या प्रकारामुळे मुंबईसह सा-या कोकणात राष्ट्रवादीिवरोधात संतापाची लाट पसरली आहे.
लोकसभा िनवडणुकीत नीलेश राणेंचा सणकून पराभव झाल्यानंतर राणेंना मोठा धक्का बसला होता. या िनवडणुकीच्या अगोदरच राणेंचे जवळचे सहकारी राजन तेली, काका कुडाळकर, दत्ता सामंत, गोट्या सावंत यांना बाहेरचा रस्ता धरावा लागला होता. राणेंचे धाकटे िचरंजीव िनतेश राणे यांनी राणेंच्या या िनष्ठावंत कार्यकर्त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल संशय घेतला. यामुळे नाराज होऊन या सा-यांना बाहेर पडावे लागले. या सर्वांच्या राजकीय अिस्तत्वाचा प्रश्न असताना तेलींना उमेदवारी देऊन राष्ट्रवादीने राजकारणाचे गुन्हेगारीकरण करण्याची आपली परंपरा कायम ठेवली आहे.

सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर आपल्या समर्थकांसह िशवसेनेत गेल्याने राष्ट्रवादीला िसंधुदुर्गात आधार उरलेला नाही. या परििस्थतीचा फायदा उचलून तेलींनी राष्ट्रवादीला जवळ केले. मात्र िशवराम दळवींसारखे माजी आमदार व सक्षम उमेदवार असताना काँग्रेसमधून आलेल्या आणि गुन्हेगाराचा िशक्का असलेल्या तेलींना उमेदवारी देणे म्हणजे िसंधुदुर्गातून उरलीसुरली राष्ट्रवादी संपवून टाकण्यात आल्याचा आरोप दीपक नाईक, श्रद्धा कुबल या राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी केला आहे. दरम्यान, तेली यांच्या पक्षप्रवेशामुळे आता विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.
सावंतवाडीतून राजन तेलींना िवधानसभेचे ितकीट

राजन तेलींचे नो कॉमेंटस
नारायण राणेंना सोडून जाणे आणि राष्ट्रवादीतील प्रवेश यािवषयी काही बोलण्यास तेलींनी मात्र नकार दिला. राणेंना सोडून जाण्याचे िन िश्चत कारण काय, असे खोदून वचारले असता मी राणेंिवषयी काहीही सांगणार नाही आणि पुढेही बोलणार नाही.

बदलत्या राजकारणामुळे तेलींना प्रवेश- तटकरे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याची हत्या करणा-याला राष्ट्रवादीत प्रवेश देऊन राजकारणाचे गुन्हेगारीकरण करण्याला तुम्ही समर्थन देत आहात का, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना िवचारले असता ते म्हणाले, आता राजकीय परििस्थती बदलली आहे. आता काही गोष्टी मागे टाकायला हव्यात. यामुळेच आम्ही तेलींना प्रवेश दिला आहे.