आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • NCP Announces Split With Congress In Maharashtra

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर विधानसभा लढणार, राज्यात आघाडीचे राजकारण संपले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवसेना- भारतीय जनता पक्षाची युती संपुष्टात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेससोबतची आघाडी तोडत असल्याची घोषणा केली आहे. येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यलयात आयोजित पत्रकार परिषदेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे सांगितले.
गेल्या 15 वर्षांपासून राज्यात काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. धर्मनिरपेक्ष शक्तींना सत्तेपासून दुर ठेवण्यासाठी ही आघाडी झाली होती, असे पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. राष्ट्रवादीने 144 जागांचा आणि मुख्यमंत्री पदासाठी अडीच - अडीच वर्षांचा प्रस्ताव दिला होता, त्यावर काँग्रेसकडून 124 जागांचा अधिकृत प्रस्ताव देण्यात आला, मात्र त्यानंतर त्यांच्याकडून जागावाटपावर कोणताच प्रस्ताव आला नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक असताना काँग्रेसने त्यांच्या उमेदवारांची यादी बुधवारी जाहीर केली. त्यानंतर आम्हाला निर्णय घेणे आवाश्यक आहे, असे पटेल यांनी सांगितले.
राष्ट्रवादी सरकारमधून बाहेर
राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढण्याचा निर्णय जाहीर केला, त्यासोबतच पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारमधून बाहेर पडण्याची घोषणा केली. शुक्रवारी राज्यपालांकडे उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
काय म्हणाले प्रफुल्ल पटेल वाचा, पुढील स्लाइडमध्ये