आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Omar Abdullah Tweets On Article 370 News In Marathi

कलम 370 राहिल किंवा जम्मू-काश्मिर भारताचा अविभाज्य भाग राहणार नाही- ओमर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- घटनेतील कलम 370 वर चर्चा घडवून आणण्यासाठी नरेंद्र मोदी सरकार अनुकूल आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्रसिंह यांनी दिल्यानंतर जोरदार वादाला सुरवात झाली आहे. यावर जम्मू आणि काश्मिरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले, की एकतर कलम 370 राहिल किंवा जम्मू आणि काश्मिर भारताचा अविभाज्य भाग राहणार नाही.
यासंदर्भात ट्विटरवर आक्षेपार्ह टिवटिव करीत ओमर अब्दुल्ला म्हणाले, की कलम 370 वर फेरविचार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, असे नवीन पीएमओंनी सांगितले आहे. वॉव, फारच लवकर सुरवात झाली. मला माहित नाही असे कोण बोलत आहे. माझे शब्द गांभिर्याने घ्या. मी केलेली ट्विट सेव्ह करून ठेवा. एकतर कलम 370 राहिल किंवा जम्मू आणि काश्मिर भारताचा अविभाज्य भाग राहणार नाही.
ओमर अब्दुल्ला पुढे म्हणाले, की जम्मू आणि काश्मिर या राज्याला उर्वरित भारताशी जोडणारा कलम 370 एक घटनात्मक दुवा आहे. यावर फेरविचार करण्याची चर्चा अत्यंत वाईट आणि बेजबाबदार आहे.