आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thackeray Wife Sharmila Thackeray Information In Divyamarathi

स्वयंपाक घर सांभाळून पतीला \'राज\'कारणात सहकार्य करणार्‍या शर्मिला ठाकरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख राज ठाकरे यांची सहचारिणी शर्मिला ठाकरे या स्वयंपाक घर ते राजकारणात सक्रिय आहेत. शर्मिला ठाकरे नेहमी पती यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहतात. एकदा तर त्यांनी राज ठाकरेंसाठी पोलिस ठाण्याबाहेर धरणे आंदोलनही केले होते. शर्मिली ठाकरे यां सामाजिक कार्यातही सक्रिय असतात.

दिग्दर्शक कन्या शर्मिला ठाकरे...
शर्मिला ठाकरे या प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक मोहन वाघ यांच्या कन्या आहेत. राज आणि शर्मिला यांना अमित आणि उर्वशी अशी दोन मुले आहेत. शर्मिला ठाकरे नेहमी राज ठाकरे यांच्यासोबत दिसतात. राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे राजकारणाशिवाय बॉलिवूड, क्रिकेटजगत तसेच उद्योगजगतातील कार्यक्रमांना आवर्जुन उपस्थिती देतात.

राज ठाकरे सध्या महाराष्‍ट्राच्या दौर्‍यावर आहेत. राज यांच्या 4 ऑक्टोबरपर्यंत जाहीर सभा आहेत. 15 प्रचार सभांमध्ये राज ठाकरे संबोधित करतील. राज ठाकरे दौर्‍यावर असताना मुंबईत पक्षाच्या प्रचाराची धुरा त्यांची सहचारिणी म्हणजेच शर्मिला ठाकरे या यशस्वीरित्या सांभाळत आहेत. मागाठाणे येथील मनसेचे विद्यमान आमदार प्रवीण दरेकर यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन शर्मिली यांच्या हस्ते झाले. बोरीवली (पूर्व), शांतिवन भागात झालेल्या कार्यक्रमात शर्मिली यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. राज ठाकरे हे पाच ऑक्टोबरला मुंबईत येत आहेत.

पतीसाठी धरणे आंदोलनही केले होते...
स्वयंपाकघरच नव्हे तर राज ठाकरे यांच्या पाठीमागे एखाद्या ढालीसारख्या उभ्या राहणार्‍या शर्मिला ठाकरे पक्षाच्या कार्यात सहकार्य करतात. नेहमी राज ठाकरे यांच्यासोबत असतात. काही महिन्यांपूर्वी टोलनाक्याच्या मुद्यावर मुंबई पोलिसांनी राज ठाकरे यांना अटक केली होती. यावेळी पतीसाठी पोलिस ठाण्यासमोर शर्मिला ठाकरे धरणे आंदोलन केले होते. त्यानंतर पोलिसांनी राज ठाकरे यांची सूटका केली होती.

अशी झाली होती राज आणि शर्मिला यांची भेट...
राज ठाकरे यांच्या मातोश्री कुंदा ठाकरे या आजारी असताना त्यांना रुग्णालयात दाखल करण्‍यात आले होते. तेव्हा शर्मिला या रुग्णालयात एका नातेवाईकांसोबत आल्या होत्या. तेव्हा राज आणि शर्मिला यांची पहिली भेट झाली होती‍. शर्मिला यांना राज यांच्या मातोश्रींनी पसंत केले. नंतर राज यांनी पसंती दिल्यानंतर दोघे लग्नाच्या बेडीत अडकले.
शर्मिला राजकारणासोबत 'कृष्णा कुंज'मधील स्वयंपाकघरही यशस्वीपणे सांभाळतात. विशेष म्हणजे ठाकरे कुटूंबियांची सून असण्याचे सगळे गुण त्यांच्या वर्तणातून प्रगट होत असतात.

सामाजिक कार्यात सक्रिय आहेत शर्मिला
शर्मिला ठाकरे सामाजिक कार्यातही सक्रिय सहभागी होतात. शर्मिला आपल्या सर्व कर्मचार्‍यांच्या हिताचे निर्णय घेतात. त्यांच्या कुटूंबियांची चौकशी करतात. शर्मिला दररोज सकाळी मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉक करण्यासाठी येतात.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, राज ठाकरे यांचे फॅमिली फोटो......