आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘कृष्णकुंज’वर सन्नाटा; बहुचर्चित ब्ल्यू प्रिंट आज येणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनसेप्रमुख राज ठाकरे हे गुरुवारी आपल्या पक्षाची बहुचर्चित ब्ल्यू प्रिंट जनतेसमोर मांडणार आहेत. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे गलितगात्र झालेल्या मनसेला ही ब्ल्यू प्रिंट नवसंजीवनी देणारी ठरेल, अशी राज ठाकरेंना आशा वाटते. मात्र, निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतरही राज यांच्या दादर येथील ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी मात्र शुकशुकाटच दिसून येतो. माटुंगा येथील मनसेच्या कार्यालयातही बोटावर मोजण्याइतकेच कार्यकर्ते दिसून येतात.