आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादंग -महायुतीत वाटा देण्याची वेळ येताच दोन्ही पक्षांनी मित्रपक्षांचा विश्वासघात केला - राजू शेट्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘लोकसभा निवडणुकीत शवसेना-भाजपला आम्ही कोणत्याही अपेक्षा ठेवता सहकार्य केले. मात्र, विधानसभेच्या वेळी महायुतीत वाटा देण्याची वेळ येताच या दोन्ही पक्षांनी मित्रपक्षांचा विश्वासघात केला. कमी जागा आमच्या हाती ठेवण्याचा प्रयत्न करून आमच्या पाठीत खंजीर खुपसला,’ असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी बुधवारी केला.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी केवळ चार मतदारसंघ वाट्याला येऊनही स्वाभिमानी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, रिपाइं, शिवसंग्राम पक्षाने युतीला मदत केली. महाराष्ट्रात युतीला जे अभूतपूर्व यश मिळाले त्यात आमचाही वाटा आहे, असा दावा हे पक्ष करत आहेत. आता विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीचे सरकार येण्याची चिन्हे दिसताच या दोन्ही नेत्यांची नियत फिरली मित्रपक्षांनाच दूर लोटण्याची खेळी खेळण्यात आल्याचा आरोप महादेव जानकर शेट्टी यांनी केला आहे. त्यामुळे आता महायुतीत दुरावा निर्माण झाला असून कोणत्याही क्षणी त्यांचा संसार तुटण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. स्वाभिमानी संघटना रासप महायुतीतून वेगळे झाल्यास सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर पुण्याच्या काही भागात युतीच्या उमेदवारांसमोर ते उपद्रवमूल्य सिद्ध करू शकतात. लोकसभेला हरियाणात सोबत असलेल्या हरियाणा विकास पार्टीने विधानसभेच्या तोंडावर भाजपशी फारकत घेतली आहे.
आता महाराष्ट्रातही घटक पक्ष वेगळे झाल्यास भाजप मित्रपक्षांचा वापर ‘यूज अँड थ्रो’ करतो अशी प्रतिमा तयार होईल, अशी भीती भाजप नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे शिवसेनेवर दबाव कायम ठेवण्यासाठी मित्रपक्षांशिवाय आम्हीही युतीत राहणार नसल्याची भूमिका भाजप नेते घेत आहेत.