आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • RPI Leader Ramdas Athawale Demanding Depty CM Post

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रामदास आठवले यांचा बालहट्ट सुरूच;शिवसेनेला म्हणाले, उपमुख्यमंत्रिपद देता का?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कोंडीत सापडलेल्या शिवसेना आणि भाजपकडे अवास्तव मागण्या करत रिपाइं नेते रामदास आठवले यांनी दोन वर्षे युतीकडून वारंवार झालेल्या अवमानाचे शुक्रवारी चांगलेच उट्टे काढले. उमेदवारी दाखल करण्याचा शनिवारी शेवटचा दिवस आहे, तरी रिपाइं कोणत्या गटात जाणार याबाबतचा निर्णय गुलदस्त्यात ठेवत आठवले महत्व वाढवत आहेत.

आठवले यांनी शिवसेना आणि भाजप नेत्यांशी आघाडीबाबत सविस्तर चर्चा केली. शिवसेनेकडे आठवले यांनी उपमुख्यमंत्री, विधानसभेच्या २५ जागा, महामंडळे आणि विधानपरिषद जागांची मागणी केली. तर भाजपच्या गोटात जाण्यासाठी केंद्रात मंत्रीपद, दोन राज्यपाल पदे, विधानसभेच्या २५ जागांची मागणी केली.

रिपाइंने ७० विधानसभांच्या जागांवर अर्ज भरले आहेत. आठवले यांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही. मात्र, रिपाइं कार्यकर्ते भाजपशी आघाडी करण्याच्या विचाराचे आहेत.
शिवसेनेची सत्ता येईल, याच नेम नाही. सत्ता आली तरी सेना उपमुख्यमंत्रीपद देईल, याचा कार्यकर्त्यांना विश्वास नाही. कारण शिवसेनेने महापालिकांच्या निवडणुकीत रिपाइंला दूरच ठेवले.

भाजपशी आघाडी
शिवशक्ती-भीमशक्तीचानारा देत दररोज मातोश्रीवर पायधूळ झाडणारे आठवले शिवसेनशी काडीमोड घेण्याच्या विचारात आहेत. राज्यसभा देण्यास तसेच लोकसभा निवडणुकीत सातारा ही पडीक जागा दिल्यामुळे आठवले सेना नेतृत्ववार विश्वास ठेवण्यास तयार नसल्याचे सांगितले जाते.
गवई "मातोश्री'वर
रिपाइंचे डॉ. राजेंद्र गवई यांनी काही छोट्या पक्षांना बरोबर घेऊन महाशक्ती आघाडी स्थापन केली आहे. आठवले भेटून गेल्यानंतर शुक्रवारी डॉ. गवई यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. शनिवारी रिपाइं सोडून गेल्यास भगव्याला निळ्याची साथ असावी म्हणून शिवसेना डॉ. गवई यांना आपल्याबरोबर घेऊ शकते.