आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shivsena Leader Anat Gite Will Handover Resignation Of Central Ministrey To PM

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंतप्रधान मोदी भारतात परतल्यानंतर अनंत गिते राजीनामा देतील - उद्धव ठाकरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील युती तुटल्यानंतरही शिवेसनेचे नेते अनंत गीते अजून एनडीए सरकारमधून बाहेर पडलेले नाही. यावरुन विरोधकांनी घेरण्याची सुरवात केल्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौर्‍यावरुन परतल्यानंतर गिते त्यांची भेट घेऊन राजीनामा देतील असे म्हटले आहे.
अनंत गिते भाजपच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारमध्ये केंद्रीय अवजड उद्योगमंत्री आहेत. भाजप नेत्यांनी 25 वर्षांपासूनची युती तुटल्याची घोषणा केल्यानंतर शिवसेना एनडीएमधूनही बाहेर पडणार, असा कयास लावला जात होता. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळातील शिवसेनेचे एकमेव मंत्री अनंत गीते राजीनामा केव्हा देणार असा प्रश्न विचारला जात होता. त्यावर शिवसेनेकडून कोणीही अधिकृत बोलण्यास समोर येत नव्हते. मुंबईमध्ये सोमवारी पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना याबाबत विचारले असता, पंतप्रधान मोदी परदेश दौर्‍यावरून परतल्यानंतर गीते त्यांची भेट घेतली आणि राजीनामा देतील असे उद्धव यांनी सांगितले आहे. मुंबई महापालिकेतही भाजपसोबतची युती तोडणार का, या प्रश्नावर त्यांनी मी शांतपणे विचार करत असतो, एवढेच उत्तर दिले. त्यामुळे शिवसेना मुंबई महापालिकेची सत्ता सोडण्याच्या मानसिकतेत नाही असेच दिसते.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी विधानसभा निवडणूक प्रचाराच्या पहिल्याच सभेत शिवसेनेवर हल्ला चढवला. भाजपने महायुती तोडून सर्व छोट्या पक्षांना सोबत घेतले. एवढा अपमान होऊनही शिवसेना स्वाभिमानाच्या गप्पा मारत सत्तेला चिकटून असल्याचा टोला हाणला होता.

अनंत तरेंची नाराजी दूर
ठाणे शहर विधानसभेचे तिकीट न मिळाल्याने शिवसेनेचे नेते अनंत तरे नाराज होते. त्यांनी शिवसेनेचे विद्यमान आमदार एकनाथ शिंदे यांच्याविरोधात भारतीय जनता पक्षाकडून अर्ज दाखल केला होता. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तरे यांना बोलावून घेतले आणि विधानपरिषदेचे आश्वासन दिल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. त्यानंतर अनंत तरे यांनी नाराजी दूर झाल्याचे सांगितले आहे. मी शिवसेनेचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. माझे नाव शेवटच्या क्षणापर्यंत निश्चित असताना ते कसे कापल्या गेले असा त्यांचा सवाल होता.

पुढील स्लाइडमध्ये, 'रामदास आठवलेंना खासदारकीसाठी माझा पढाकार'