आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: औरंगाबादमध्ये जल्लोष, 11 फुटी गणेशमुर्तीचे आकर्षण

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- येथील गणेश मंडळांनी आज (सोमवार) ढोल ताशांच्या निनादात गणेश मुर्तींची प्रतिष्ठापना केली. त्यापूर्वी वाजत गाजत भव्य मिरवणुका काढून गुलाल उधळीत उत्साही जल्लोष केला. त्याला कार्यकर्त्यांसह इतर नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. येथील बाजारपेठेत आजही गणेशमुर्ती विकत घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्याच्या जोडीला आरासाची बाजरपेठही गजबजलेली होती.

औरंगाबादमधील बालकृष्ण गणेश मंडळाने आज 11 फुटी गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना केली. या मंडळाने गणेशमुर्तीला 11 किलो चांदिपासून तयार केले दागिने अर्पण केले आहेत. या मंडळाची मुर्ती बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

स्वराज गणेश मंडळाची मिरवणुकही मोठ्या जल्लोषात काढण्यात आली. या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भगवे फेटे घालून लक्ष वेधून घेतले. यावेळी चित्तवेधक प्रात्याक्षिके सादर करण्यात आली.

छायाचित्रांसाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...