आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंबोडियाचा \'श्री गणेश\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कंबोडियात गणेशास 'प्रहकनेस' असे म्हणतात. ही गणेशमूर्ती १३ व्या शतकातील असून ती ब्राँझची बनविलेली आहे. मूर्तीवर विविध अलंकार असून ते हिरव्या रंगात दाखविलेले आहेत. कंबोडिया इतिहासात मात्र ही गणेश मूर्ती दुर्मिळ मानली जाते. तसेच चिनी साहित्यात वर्णन केल्याप्रमाणे राजे महाराजे आपल्या सिंहासनावर ज्या पद्धतीने बसत त्याच पद्धतीची ही मूर्ती बसलेली आहे.

कंबोडिया संस्कृतीचे शिल्प व कला कौशल्याचे दर्शन या गणेश मूर्तीकडे पाहिल्‍यानंतर घडते. कंबोडियन राजे ज्या प्रकारचा मुकुट व अलंकार पेहराव धारण करीत असत त्याच पद्धतीचा मुकुट श्री गणेश धारण केलेला आहे. मुकुट पूढील बाजूस किरीटासारखा व मागील बाजूस चक्राकार उंच व अगदी निमुळता होत गेलेला आहे. तसेच यावर विविध प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे. या मूर्तीत भारत व चीन संस्कृतीचा मिलाप आढळतो. पण नजर मात्र जावा पद्धतीप्रमाणे खाली आहे.