आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्थिव तत्त्वांपासूनच गणपतीचा जन्म

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणपतीची मूर्ती पीओपीऐवजी मातीचीच का असावी याचे रहस्य गणपतीच्या जन्मकथेमध्ये लपले आहे. पुराणातील कथेनुसार, पार्वतीने मातीपासून बालक तयार केले (उटण्यांपासून निर्मिती झाल्याचेही अनेक संदर्भ) आणि त्यात प्राण ओतून माता पार्वती अंघोळीसाठी निघून गेल्या. ते बालक आईच्या आज्ञेनुसार दारावर पहारा देऊ लागले. त्या वेळी महादेवांचे आगमन झाले. परंतु बालकाने त्यांना अडवल्यामुळे महादेवांनी बालकाचा शिरच्छेद केला. माता पार्वतीने आणलेल्या संकटामुळे आणि क्रोधामुळे बालकास हत्तीचे मस्तक लावून त्यात प्राण ओतण्यात आले. याप्रमाणे गणपती पुनरुज्जीवित होऊन एका नव्या आणि दिव्य रूपात भक्तांसमोर प्रकट झाले. या कथेत त्यांच्या जन्मात पार्थिव तत्त्व म्हणजेच मातीच्या तत्त्वाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. त्यामुळे आपणास विनंती की, या वर्षी कृत्रिम सामग्रीपासून तयार करण्यात आलेल्या मूर्तीऐवजी मातीपासून बनवलेल्या मूर्तीचीच स्थापना करावी.
मोहन दाते, पंचांगकर्ते, सोलापूर