आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आले गणराया... विघ्न हराया.., अशी करा गणरायाची प्राणप्रतिष्ठा !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगणेशाची पूजा स्वत:ला शक्?यतो यथासांग करता यावी या दृष्टीने गणेशपूजेचा विधी. हा पूजाविधी जाणत्या माणसांकडून समजावून घ्यावा.

मंगलमूर्तीची प्राणप्रतिष्ठा गुरुजींअभावी नीट झाली, असे वाटत नाही. कॅसेटवरून ऐकून पूजा करणे मनाला पटत नाही. तेव्हा ही पूजा आपणच मंत्र म्हणून करणे, हा सोपा पर्याय आहे. ती कशी करता येईल याचे मार्गदर्शन..

भाद्रपद शुद्ध चतुर्थीला श्रीगणेशाची मातीची चांगली मूर्ती आणून प्रशस्त ठिकाणी शक्?यतो पूर्वाभिमुख करून स्थापना करावी. प्रेक्षणीय आरास, रांगोळी, मुबलक प्रकाश हवा. रक्तचंदन, दूर्वा, सिंदूर, फुले, पत्री इत्यादी पूजासाहित्य घेऊन पुढीलप्रमाणे पूजा करावी. दोन वेळा आचमन करून, प्राणायाम करावा. हातात अक्षता, उदक (पाणी) घेऊन देश-काळाचा उच्चार करून ‘मम सकुटुंबस्य क्षेमस्थिती आयुरारोग्य ऐश्?वर्याभिवृद्धी, सर्वकाम निर्विघ्न सिद्धी, पुत्रपौत्र धनधान्य समृद्धीद्वारा प्रतिवार्षिक विहितम् श्री सिद्धिविनायक देवताप्रीत्यर्थ ध्यानावाहनादी षोडशोपचारै: पूजां करिष्ये।’ असा संकल्प सोडावा. कलश, शंख, घंटा, दीप यांचे पूजन करून कलशातील पाणी तुळशीपत्राने पूजा साहित्यावर व आजूबाजूस आपल्या अंगावर प्रोक्षण करावे (शिंपडावे).

प्राणप्रतिष्ठा
रक्तांबोधिस्थपोतोल्लसदरुण सरोजधिरूढा कराब्जै:।
पाशाकोदंड भिक्षूद्रभवमथगुणप्यंकुशम् पंचबाणान्।।
बिभ्राणासृक्कपालं त्रिनयनलसिता पीतवक्षोरुहाढ्याम्।
देवी बालार्कवर्णा भवतु सुखकारी प्राणरुक्ति: परान:।।


याप्रमाणे ध्यान करून ॐ चा पंधरा वेळा उच्चार करून देवाच्या डोळ्यांना फुलाने तूप लावावे. गंध, फूल, अक्षता, हळद, कुंकू, धूप, दीप दाखवून गूळ-खोबर्‍याचा नैवेद्य दाखवावा.

षोडशोपचार पूजा
एकदंतं शूर्पकर्णम् गजवक्त्रं चतुर्भुजम् ।
पाशांकुशधरं देवं ध्यायेत्सिद्धिविनायकम् ।।
ध्यानं सर्मपयामि।। अक्षता वाहणे.
आवाहयामि विघ्नेशं सुरराजार्चितेश्वरम्।
अनाथनाथं सर्वज्ञं पूजार्थ गणनायक।।
आवाहनं सर्मपयामि।। अक्षता वाहणे.
विचित्ररत्न खचितम् दिव्यास्तरणं संयुतं।
विघ्नराज गृहाणेदम् आसनं भक्तवत्सल।।
आसनं सर्मपयामि।। अक्षता वाहणे.
सुगंधिसह कर्पूरम् मिर्शितं उत्तमं जलम्।
पाद्यं गृहाण देवेश प्रियतां गणनायक।।
पाद्यं सर्मपयामि।। दूर्वांनी किंवा फुलांनी पायाशी पाणी प्रोक्षण करावे.
अध्र्यं च फुलसंयुक्तं गंधपुष्पाक्षतैर्युतं।
गणाध्यक्ष नमस्तेस्तु गृहाण करुणानिधे।।
अध्र्यम् सर्मपयामि।।
गंध, अक्षता, फूल, पाणी एकत्र करून प्रोक्षण करावे.
दध्याज्यमधुसंयुक्तं मधुपर्कम्? मयाहृतम्।
गृहाण सर्व लोकेश गणनाथ नमोस्तुते।। दही, तूप, मध एकत्र करून प्रोक्षण करावे.
विनायक नमस्तुभ्यं त्रिदशैरभिवंदितम्?।
गंगोदकेन देवेश सद्य आचमनं कुरु।।
आचमनीयं सर्मपयामि।। पाणी प्रोक्षण करावे.
गंगोदकसमानीतं सुवर्णकलशेस्थितम्।
मलापकर्ष स्नानार्थ गृहाण वरदेश्वर।।
स्नानम् सर्मपयामि।। पाणी प्रोक्षण करावे.
पयोदधिघृतंचैव शर्करा मधुसंयुतम्।
स्नानार्थ तेप्रयच्छामि प्रीत्यर्थ प्रतिगृह्यताम्?।।
पंचामृतं सर्मपयामि।। पंचामृत प्रोक्षण करावे.
कर्पूरैला समायुक्तं सुगंधिद्रव्यसंयुतं।
गंधोदकं मया दत्तं स्नानार्थ प्रतिगृह्यतां।।
गंधोदकम् सर्मपयामि।।

पळीत पाणी व गंध टाकून प्रोक्षण करावे.
अत्तर लावून कोमट पाणी करून प्रोक्षण करावे. देवास गंध, अक्षता, हळद, कुंकू, फुले, दूर्वा, धूप, दीप दाखवून शिल्लक पंचामृताचा नैवेद्य दाखविणे. विडा, अक्षता, फळे यावर उदक सोडणे - येथे पूर्वपूजा पूर्ण झाली. देवावरील फुले काढून उत्तरेस ठेवावी व अभिषेक करावा.

(अथर्वशीर्ष म्हणावे)
त्यानंतर
रक्तवस्त्रद्वयं देव देवांग सदृशं प्रभो।
सर्वप्रदं गृहाणेदम् लंबोदर हरात्मज।।
वस्त्रं सर्मपयामि।। कापसाची वस्त्रे वाहणे.
राजतं ब्रह्मसूत्रं च कांचनं चोत्तरीयकम्?।
गृहाण चारुसर्वज्ञ भक्तानां वरदोभव।।
यज्ञोपवीतं सर्मपयामि ।। डाव्या खांद्यावरून उजव्या हाताखाली देवास जानवे घालणे.
गंधं गृहाण भगवन्? सवर्गंध समन्वितम्।
गणाध्यक्ष नमस्तेस्तु भक्ताभीष्ट फलप्रद।।
गंधं सर्मपयामि।। गंध लावणे.
अक्षतान्? धवलान् देव गृहाण द्विरदानन।
अनाथनाथ सर्वज्ञ गीर्वाण सुरपूजित।।
अक्षतान् सर्मपयामि। अक्षता वाहणे.
हरिद्रा कुंकुमं चैव सिंदूरं कज्जालान्वितम्।
मयानिवेदितं भक्त्या गृहाण परमेश्वर।।
हरिद्रा- कुंकुमम् सर्मपयामि।।
हळद, कुंकू, सिंदूर, अबीर, बुक्का देवास वाहणे.
सुगंधीनि सुपुष्पाणि रक्तवर्णानि यानिच।
अर्पयामि महाभक्त्या स्वीकुरुष्व विनायक।।


पुष्पाणि सर्मपयामि।। देवास फुले, दूर्वा व पत्री, कमळ, केवडा, शमी वाहणे. नंतर देवास धूप, दीप, मोदकांचा नैवेद्य, विडा, सुपारी, दक्षिणा, निरनिराळी फळे अर्पण करून आरती करून मंत्रपुष्प वाहावे व प्रार्थना करावी.

एकदंतं शूर्पकर्णं गजवक्?त्रं चतुर्भुजं।
पाशांकुशधरं देवं ध्यायेत्सिद्धिविनायकम्?ा्।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटी समप्रभ।
निर्विघ्नं कुरुमेदेव सर्व कार्येषु सर्वदा।।

सर्वांनी देवास गंध, फूल, दूर्वा वाहून साष्टांग नमस्कार घालावा.