आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामगणेश: गणेशोत्सवात भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील 28 वर्षांपूर्वी पन्नालालनगरमध्ये शंकरराव कोलपकर, गोपाळराव ओझे व इतर रहिवाशांनी अष्टविनायक गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. 1985 मध्ये सुरू झालेली ही परंपरा आजतागायत सुरू आहे. येथील गणपती नवसाला पावतो, अशी ख्याती आहे. मंदिरातील गणेशमूर्तीचे खास वैशिष्ट्य म्हणजे ती मुंबईतील सिद्धिविनायकाची प्रतिकृती आहे. याच मूर्तीच्या बाजूला अष्टविनायकांच्या मूर्ती आहेत. यामुळे शहरातील गणेशभक्तांना एकाच ठिकाणी अष्टविनायकाचे दर्शन घेता येते. शहर तसेच ग्रामीण भागातून येणार्‍या भाविकांचे हे मंदिर र्शद्धास्थान बनले आहे. गणेशोत्सवात मंदिरात भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी असते. पूजाअर्चा, आरती, भजन, कीर्तन असे कार्यक्रम नित्यनियमाने घेतले जातात. एकादशी आणि चतुर्थीला सहस्रावर्तन, अभिषेक करण्यात येतो. गणेशोत्सवात संगीत महोत्सव, प्रवचन, सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यानमाला, आरोग्य शिबिर तसेच विविध स्पर्धांचे आयोजनही करण्यात येते. उत्सवात सर्वांना सहभागी करण्याच्या दृष्टीने धार्मिक, युवा, क्रीडा तसेच वैद्यकीय आणि महिलांकरिता वेगवेगळ्या समित्या नेमण्यात येतात. पन्नालाल विकास संस्थेच्या माध्यमातून या मंदिराचे काम सुरू आहे. या संस्थेचे अध्यक्ष भास्कर देशपांडे असून उपाध्यक्ष म्हणून शशिकांत जोशी, सचिव विष्णू वाणी, भिकाजीपंत पाडाळकर काम पाहतात. शब्दांकन : विद्या गावंडे