आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदेशातील गणराय: चायना टाऊनमधील विनायक टेंपल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशोदेशात पोहोचलेला गणेशोत्सव वरचेवर लोकप्रिय होत असला तरी चायना टाऊनमध्ये तो 1925 मध्येच पोहोचला आहे. भारतातील तामिळ बांधवांची संख्या चायना टाऊनमध्ये मोठय़ा प्रमाणावर आहे. सिंगापूर व्यावसायिकांचा परिसर म्हणून चायना टाऊनची ओळख आहे. तेथील केआँग सैक रस्त्यावर तामिळ बांधवांनी 1925 मध्येच हे मंदिर बांधले आहे. विनायक चतुर्थी हाच तेथील सर्वात महत्त्वाचा उत्सव आहे.

अगदी मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या मंदिर उभारणीपासूनचा इतिहास थिरू मालानिप्पन यांनी पुस्तकातून लिहून काढला आहे. मंदिरातून दररोज नित्य पूजा-अर्चा होते. चतुर्थीपासून तेथेही गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली आहे. या मंदिराला जुनी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. मंदिर उभारणीत तेथील गणेश भक्तांचे योगदान खूप मोलाचे ठरले आहे. सिंगापूरसारख्या पर्यटकांचे आकर्षण असलेल्या परिसरात (चायना टाऊन) भारतीयांचे श्रध्दास्थान गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत.