आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्‍सव विदेशातला: बर्लिनमध्‍ये पोहोचले गणपती बाप्‍पा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीयांचे श्रध्दास्थान असलेले गणपती बाप्पा बर्लिनमध्येही पोहोचले आहेत. तेथील भारतीयांनी 2004 मध्ये बर्लिनमध्ये गणेश मंदिर उभारण्याचा संकल्प सोडला अन् त्या दृष्टीने प्रयत्नाला सुरुवात केली. 2006 मध्ये त्यासाठी संस्थेची स्थापना करण्यात आली. मंदिर उभारणीसाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींचा अभ्यास सुरू केला. जागा, मंदिराचा परिसर, प्रवेशद्वार, पार्किंग अशा सर्व बाबींचा विचार करून मंदिर उभारणीचा आराखडा तयार केला गेला. त्यात 18 चौरस मीटर जागेत मंदिर उभारण्याचे ठरले. त्यासाठी जागा निश्चित झाली.

मंदिराची उंची सहा मीटर असेल तर प्रवेशद्वार 17 मीटर उंचीचे ठरवण्यात आले. तसा आराखडा तयार झाला, तो तेथील सर्व प्रशासकीय व न्यायालयीन प्रक्रियेनंतर 2006 मध्ये मंजूर झाला. या मंदिर उभारणीसाठी निधी उभारण्याचे आवाहन सर्व भारतीयांना करण्यात आले. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. या मंदिराच्या रूपाने भारतातील गणेशोत्सव बर्लिनमध्येही पोहोचला. त्यासाठी आता ‘श्री गणेश हिंदू टेंपल’ ही संस्था श्रध्देने कार्यरत आहे. भारतीय गणेशोत्सव वरचेवर देशोदेशी लोकप्रिय होत आहेच, पण भारतीयांप्रमाणेच विदेशी लोकांच्या श्रध्देचे स्थान बनत असल्याचे यातून दिसते.