आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरीचे आगमन: गणरायापाठोपाठ आली माता पार्वती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला महाराष्ट्रात व देशातही गणपतीची स्थापना होते. प्रत्येक घरात प्रथेप्रमाणे गणपतीची प्राणप्रतिष्ठापणा केली जाते दहा दिवसांनंतर विसर्जन होते. चतुर्थीनंतर गणेशाची माता पार्वती-म्हणजेच गौरी हिचेही त्यापाठोपाठ आगमन झाले आहे.

पश्चिम महाराष्ट्रात गौरी-गणपती, तर मराठवाड्यात महालक्ष्मी असे म्हणतात. महालक्ष्मीचा हा सण तीन दिवस असतो व तो घरोघर साजरा केला जातो. पहिल्या दिवशी आगमन, दुस-या दिवशी गौरी भोजन व तिसर्‍या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुक्ल अष्टमीला या गौरी -महालक्ष्मीचे विसर्जन करण्यात येते. तीन दिवस अगदी आनंदाचे, उत्सवाचे वातावरण असते. तिसर्‍या दिवशी गौरीचे विसर्जन होणार असल्यामुळे मात्र काहीशी दु:खाची छाया असते.

गौरी-गणपतीचा हा सण महाराष्ट्रात मोठ्या श्रद्धेने, पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. गौरी विसर्जन साधारणपणे तिस-या दिवशी वाजत गाजत व गौरीचा जयघोष करीत केले जाते. महाराष्ट्रात गौरी-गणपती या सणाचे आगळे असे सांस्कृतिक महत्त्व आहे.

पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करून पाहा; पुण्यातील गौरीगणपतीचे छायाचित्रे.....