आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gram Ganesh Karnpura Sidhivinayak Ganpati Maharashtra

ग्राम गणेश: सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी वर्षभर रीघ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जवळपास 25 वर्षांपूर्वी कर्णपुरा येथे सिद्धिविनायक गणपती मंदिराची स्थापना झाली. कर्णपुरा देवीमुळे हे ठिकाण भक्तांच्या आवडीचे आहे; परंतु नवसाला पावणार्‍या सिद्धिविनायकामुळेही मंदिराची ख्याती दूरदूरपर्यंत पोहोचली आहे. सुंदर, आकर्षक मूर्ती हे मंदिराचे मुख्य आकर्षण आहे. देवीचे दश्रन घेण्यासाठी येणारे सर्व भक्त प्रथम लाडक्या बाप्पाचे दश्रन घेतात. केवळ गणोत्सवातच नाही, तर वर्षभर या मंदिरात भक्तांची दश्रनासाठी रीघ लागलेली असते. गणेशोत्सवात मंदिरात अनेक कार्यक्रमांची रेलचेल असते. दररोज दोन वेळा येथे पूजा-अर्चा केली जाते, अशी माहिती शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी दिली. या मंदिरातील गणपतीची आकर्षक मूर्ती जोधपूरहून आणण्यात आली आहे, तर गणेशोत्सवात दहा दिवसांत अभिषेक, प्रवचन आणि पूजा यांना सर्वाधिक महत्त्व असते. एवढेच नाही, तर देवीच्या दश्रनासाठी आलेली नवदांपत्येही गणरायाचे दश्रन घेण्यासाठी मोठय़ा श्रद्धेने येतात.
शब्दांकन : विद्या गावंडे