आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेतील हिंदू टेम्‍पल ऑफ अ‍ॅरिझोना, गणरायाचे विदेशगमन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतातील गणेशोत्सव देशोदेशी पोहोचला आहे. भारतीयही जगभरात पसरले आहेत. ते आपली संस्कृती जपण्यासाठी त्या-त्या देशात मंदिरे उभारून भक्ती, उपासना करतात. भारतात सोमवारपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली. मात्र, युनायटेड स्टेट्स मधील अँरिझोना सिटीमध्ये रविवारपासूनच गणेशोत्सवाला सुरुवात झाली. कॅलिफोर्निया, मॅक्सिको सिटीजवळ असलेल्या ‘अँरिझोना’मध्ये एन हेडन रोडवर 2000 साली हिंदू टेम्पल उभारण्यात आले आहे.

अमेरिकन संस्कृतीत भारतीय संस्कृतीचा प्रभाव वाढतो आहे, हेच या मंदिराच्या उभारणीतून स्पष्ट झाले आहे. या मंदिराची उभारणी करणारे भारतीयच अर्थात अमेरिकेत वास्तव्यास असलेले नागरिक आहेत. रवी कोटेकर, अश्वनी बस्ती, सुरेंद्र सिंग यांच्यासह 11 जणांचे व्यवस्थापन मंडळ या मंदिरासाठी काम करते आहे. रविवारी ते सकाळी 10.30 वाजताच चतुर्थीनिमित्त गणेशपूजेचा कार्यक्रम झाला. दुपारी 12.15 वाजता आरती होऊन गणेशोत्सवाला सुरुवात झाली. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तेथे श्री. व्यंकटेश्वरा, राधाकृष्ण, हनुमान यांच्या पूजा होतात, सत्यनारायणाची कथा म्हटली जाते. हे सर्व कार्यक्रम वर्षभराच्या ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे होत असतात. ‘हिंदू टेम्पल ऑफ अँरिझोन’ ही वेबसाइट असून त्यावर मंदिरासंदर्भातील विविध प्रकारची माहिती त्यात आहे. तेथील युवकांसाठी हिंदी क्लासेसची 10 जुलै 2001 पासून सुरुवात करण्यात आले आहे. तेथे मंदिरातील अभिषेकासाठी 51 डॉलर तर अर्चनासाठी 21 डॉलर एवढी रक्कम घेतली जाते.