आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंडनमध्‍येही होतो महाकुंभाभिषेक सोहळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातासमुद्रापार गेलेल्या भारतीयांनी गणेशोत्सवाचा उत्साह लंडनमध्येही वाढवला आहे. ‘भविष्यात चांगल्या कामाची दिशा मिळावी’ असे साकडे घालत तेथे गणरायाची मनोभावे पूजाअर्चा केली जात आहे. लंडनमधील सर्व कायदे, नियम पाळून 1980 साली लंडनमधील इंफ्रा रोडवरील जुने चर्चिल हॉल येथे साई मंदिराच्या रूपाने भारतीयांचे प्रार्थना स्थळ करण्यात आले. तेथे 1 जानेवारी 1981 रोजी साई मंदिर उभारण्यात आले व ते खुले करण्यात आले आहे. त्यानंतर सप्टेंबर 1981 मध्ये गणपत्ये मंदिर उभारण्यात आले. युरोपातील सर्वात मोठे भारतीयांचे प्रार्थना स्थळ म्हणून ते परिचित आहे.

या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिरातूनच तेथील भारतीयांना धार्मियांना लागणार्‍या धार्मिक विधीसाठीच्या सेवा पुरविल्या जातात. तसेच वर्षभरात योगा, मेडिटेशन क्लासेस, हेल्थ सेमिनार असे उपक्रमही चालू आहेत. गणेशोत्सवानिमित्तही विविध कार्यक्रम तेथे सोमवारपासून सुरू झाले आहेत. या मंदिरात तेथील तीन हजार स्थानिक नागरिक भेट देत असतात. बहुतांश भारतीयांचा त्यात समावेश आहे. ‘श्री गणपती लंडन’ अशी या मंदिराची ओळख आहे. मंदिराचे व्यवस्थापन अनुभवी लोक पाहतात. मंदिर सर्व सुविधांसह अद्ययावत ठेवण्यात आले आहे. लंडनमध्येही भारतीय संस्कृतीची विशेषत: गणेशोत्सवाची धूम या मंदिराद्वारे सुरू झाली आहे. लंडनमधील सातासमुद्रापार पोहोचलेला भारतीय गणेशोत्सव हा भारतीयांनाही निश्चितच अभिमान वाटावा असाच आहे.