आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप्पा ये, पाऊस पडू दे !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गंगापूर - लाडक्या गणरायाचे आजपासून (सोमवार) घराघरांत आगमन होणार आहे. ग्रामीण भागात गणेशोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. सार्वजनिक गणेश मंडळेही उत्सवासाठी सज्ज आहेत. रविवारी गणेशमूर्ती, सजावटींचे साहित्य खरेदीसाठी बाजारपेठा गजबजल्या होत्या. दरम्यान, जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागांत धो -धो पाऊस पडू दे, अशी प्रार्थना शेतकर्‍यांनी विघ्नहर्ता गणरायास केली आहे.

गणेशोत्सवासाठी गंगापूर शहर व ग्रामीण भागातील गणेशभक्त सज्ज झाले आहेत. शहरात या वर्षीदेखील गतवर्षीप्रमाणे पंचवीस ते तीस सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सवाची तयारी केली असून शहरातील प्रमुख आकर्षण असलेल्या पंचायत समिती येथील गणेश मंडळातर्फे याही वर्षी भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवानिमित्त गंगापूर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या मारुती चौक व शिवाजी चौकांमध्ये दोन दिवसांपासून र्शीगणेशमूर्ती व आरास करण्यासाठी साहित्यांची दुकाने थाटली असून ग्राहकांच्या स्वागतासाठी दुकानदार सज्ज झाले आहेत. आकर्षक गणपतींच्या मूर्ती भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे. काही ठिकाणी पेण येथील आकर्षक मूर्तींसोबतच दगडूशेठ हलवाई व लालबागचा राजाच्या मूर्तीच्या प्रतिकृतीदेखील विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.

गंगापूरमध्ये गतवर्षी 30 गणेश मंडळांनी श्रीची स्थापना केली होती. याही वर्षी हीच संख्या राहण्याची शक्यता आहे.