आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेपाळचा 'सूर्य विनायक'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विनायकाचे मंदिर काठमांडू पासून आठ मैलावर भाटगाव येथे आहे. या भव्य मंदिरात मध्यभागी मुख्य देवता सूर्य विनायक व त्याच्या भोवती चित्रांकित चार गणपती आहेत. हे चारही गणपती नृत्य मुद्रेत आढळतात. हे नेपाळच्या संस्कृतीचे प्रतिक आहे.

नेपाळ संस्कृती गजाननास स्वयंभू व सूर्य किरणापासून उत्पत्ती झाली असे मानतात. शिवाचा पुत्र व भारतीय उत्पत्तीच्या कल्पना ते मानत नाहीत. या मूर्तीचे प्रमुख वैशिष्ठय म्हणजे एक मस्तक व चार हात आहेत. चारही हातात वेगवेगळी वस्तू दिसतात जसे परशु, मोदक पात्र, रद आणि जपमाळ दिसते.

हा सूर्य विनायक दोन मूषकावर बसलेला आहे. चेहरा लांबट सोंड लहान व डोळे तिरकस, पायात नक्षीदार चिलखत, आणि कपाळावर तृतीय नेत्र किंवा शैवगंध आहे. मस्तकावर शिवासारखा किरीट आहे. शिवपूत्र न मानताही सूर्याप्रमाणे त्याला तेजोवलय दाखविले आहे. आसनावर शिवपिंडी सारखे आकार दिसतो हे आश्चर्य होय. हातातील जपमाळ व पायावरील नक्षीदार चिलखत हे जगात न आढळणारे दुर्मिळ गणेशाच्या मूर्तीत येथे पाहावयास मिळते ही गोष्ट आश्चर्यचकित करण्यास लावणारी आहे.

अशी आख्‍यायिका आहे, की हे मंदिर सम्राट अशोकच्या मुलीने ८ व्या शतकात बांधले तेव्हापासून इथे गणेशाची पूजा अर्चा केली जाते. येथील एका भूज पत्रावर आर्यकालीन गणेश आवाहन मंत्र लिहिलेले सापडले 'नमो भगवते आर्य गणपती हृदयाय:' या गणेशाचे नामानिधान व रचना बघून भारतीय संस्कृती व नेपाळी संस्कृतीची किती जवळीक होती हे निदर्शनास येते.