आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप्पाच्या उत्सवातून ‘भाईगिरी’ हद्दपार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत राजकीय पक्ष आणि संघटना शक्तिप्रदर्शनासाठी मोठय़ा प्रमाणावर पैसा खर्च करत असतात हे सर्वांनाच माहिती आहे. त्याचप्रमाणे मुंबई अडरवर्ल्डच्या तथाकथित ‘भाईंचा’ सार्वजनिक मंडळांत असलेला सहभाग ही बाबही फारशी जुनी नाही. छोटा राजन, भाई ठाकूर आणि वरदराजन मुदलियार हे अंडरवर्ल्ड डॉन हेही सार्वजनिक गणेश मंडळांचे सदस्य होते.

टिळकनगरचे सह्याद्री क्रीडा मंडळाशी छोटा राजन संलग्न होता. कितीही प्रयत्न केला, तरी एकेकाळी या मंडळाशी छोटा राजनचा संबंध होता, ही ओळख पुसणे अशक्य होत आहे. टिळकनगरमध्येच जन्मलेला आणि वाढलेल्या छोटा राजनचा तो देश सोडून जाण्याआधी म्हणजेच 1989 पूर्वी या मंडळाशी संबंध होता, असे वृत्त आहे. मुंबई गुन्हे शाखेने तर राजन देश सोडून गेल्यानंतरही मंडळाशी त्याचे संबंध कायम होते, असा दावा केला आहे. आयोजकांनी मात्र त्याच्याशी कसलाही संबंध नसून गेल्या 20 वर्षांपासून स्वतंत्रपणे गणेशोत्सव साजरा करत असल्याचे म्हटले आहे.

डॉन वरदराजन मुदलियारलाही माटुंग्यातील गणेशोत्सवाच्या आयोजनासाठी ओळखले जायचे. हे मंडळ शहरातील नामांकित मंडळांपैकी एक होते. येथे सिनेकलावंतांच्या रांगा असायच्या. 1988 मध्ये मुदलियारचा मृत्यू झाल्यानंतर मंडळाची लोकप्रियता हळूहळू कमी झाली आहे. या ठिकाणी झालेल्या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांची आजही या ठिकाणी चर्चा असते.