आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्‍याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री कसबा गणपती हे पुण्याचे ग्रामदैवत. पुण्याच्या सार्वजिनक गणेशोत्सवात या गणपतीला पहिले मानाचे स्थान आहे. शहाजीराजे भोसले यांनी पुण्यात लालमहाल बांधला तेव्हा जिजाबाईंनी या मूर्तीची स्थापना केली होती. जिजाबाईंना स्वप्नात गणपतीने दृष्टांत दिल्याने जिजाबाईंना या गणपतीची स्थापना केली होती असे म्हट्ले जाते.

छत्रपती शिवाजी महाराज लढाईला जाताना या मुर्तीचे दर्शन घेऊन जात असत. विसर्जन मिरवणुकीत या गणपतीला पहिले स्थान असते. जेव्हा १८९३ लोकमान्य टिळकांनी सार्वजिनक गणेशोत्सवाची सुरवात केली त्याच वर्षी कसबा गणपती सार्वजिनक मंडाळाची स्थापना करण्यात आली.