आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृष्णा नदीच्या काठावरचे गणपती पेठ (सांगली)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सन 1843 साली या गणेशाची स्थापना पटवर्धनांनी केली. गणेशाच्या मंदिरात शंकर, सूर्यनारायण, चिंतामणेश्वरी व श्री. लक्ष्मी नारायण अशा देवतांची मंदिरे आहेत. हे मंदिर अत्यंत भव्य आणि काळ्या दगडांनी बांधलेले आहे. देवळाचा गाभारा, पुढे पाच खणी ओटा, मोठा सभामंडप आणि नगारखाना हे महत्वाचे भाग आहेत. या मंदिराची लांबी 90 फूट आणि रुंदी 60 फूट आहे.

हे कृष्णा नदीच्या काठावर आहे. गणपतीची पूजा मूर्ती सिंहासनावर बसलेली तांब्याची आणि लहान आहे. उत्सव मूर्ती खूप मोठी आणि सुंदर आहे. गाभाऱ्यात मध्यभागी आहे. ती चार भुजेची आणि डाव्या सोंडेची आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूला ऋद्धिसिद्धी आहेत. भाद्रपद उत्सव मोठया उत्साहाने साजरा केला जातो. श्रावण ते माघ महिन्यात येथे उत्सव होत असतात.