आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थायलंडचा वैशिष्ट्यपूर्ण गणपती, बौद्धांनाही गणेशदेवता प्रिय

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या देशाचे लोक मंगोलवंशीय आहेत. मात्र, त्यांची संस्कृती आर्ययुक्त आहे. पूर्वीचा वैदिक राजधर्म होता, आता तो बौद्ध धर्म आहे; परंतु आजही येथील राज्याभिषेक व काही धार्मिक कार्य वैदिक पद्धतीने पार पाडले जातात. या देशात वैदिकांइतकीच बौद्धांनाही गणेशदेवता प्रिय आहे. येथे आढळून येणा-या असंख्य लहान-लहान मूर्तींवरून इथे गणेश खूप लोकप्रिय आहे, हे दिसून येते. अशा लहान लहान मूर्ती तिथल्या अयूथियन कारागिरांनी बनविल्या असाव्यात असा अंदाज आहे. आयूथियन म्हणजे अयूथिया. त्याकाळच्या राजधानीचे नाव होते. थायलंडमध्ये मूर्तीशिल्पाची विशिष्ट पद्धती आहे. बँकॉकच्या हिंदू मंदिरांतील गणेशाची पंचधातूची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. कामेर लोकांच्या गणेश शिल्पकृतींच्या धाटणीप्रमाणे दोन्ही मांड्या घालून हा गणेश बसलेला आहे. छातीवर जानव्याप्रमाणे सर्प धारण केलेला आहे. त्याच्या उजव्या हातात भग्नदंत लेखणीसारखा धरला आहे आणि डाव्या हातात पुस्तक आहे. त्यामुळे गणेशाला लेखकाच्या रूपात दाखविल्याचे दिसून येते. व्हिएतनाममधील हनोई ग्रंथालयात थायलंडमधील एक जुनी पोथी आहे. यामध्ये गणेशाची सहा रेखाचित्रे आहेत