आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वरद गणेश: धार्मिक कार्यासह सांस्कृतिक परंपराही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद शहरातील वरद गणेश मंदिर हे अतिशय महत्त्वाचे आणि भाविकांच्या श्रद्धेचे ठिकाण. येथील बाप्पाची मूर्ती जयपूर येथून आणण्यात आली. वेदमूर्ती विष्णुपंत निधोनकर गुरुजी यांच्या हस्ते सन 1981 मध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. येथील मंदिराचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे अष्टविनायकाच्या प्रतिकृती आहेत. त्यामुळे मंदिरात येणार्‍या भाविकांना अष्टविनायकाचे दर्शनही घेता येते. गणेश चतुर्थी, एकादशीला दूरदुरून भाविक दर्शनाला येतात. दोन वेळेस आरती आणि र्शींचा अभिषेक नित्यनियमाने केला जातो. तसेच अनेक वर्षांपासून मंदिरात कथा, प्रवचन, कीर्तन आणि व्याख्यानांचे आयोजनही करण्यात येते. या उपक्रमांमुळेच 1971 मध्ये स्थापन झालेल्या वरद गणेश मंदिराची ख्याती संपूर्ण मराठवाड्यात झाली आहे. एवढेच नाही तर मंदिर ट्रस्टने आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. धार्मिक कार्यक्रमांबरोबरच आरोग्य शिबिर, कथा, प्रवचन यासह विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक विषयावरील विविध स्पर्धा घेण्यात येतात. वरद गणेश मंदिर ट्रस्टच्या वतीने दररोज योगासन वर्ग घेण्यात येतात. येथे वर्षभर विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. गणेशोत्सवात महिलांसाठी विशेष रांगोळी, गायन, मोदक, सामान्यज्ञान स्पर्धा घेण्यात येतात, अशी माहिती गणेश मंदिर ट्रस्टच्या गणेश सभेचे अध्यक्ष प्र.र. राशिनकर यांनी ह्यदिव्य मराठीह्णशी बोलताना दिली.
शब्दांकन : विद्या गावंडे