आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात गणपतींच्या देखाव्यांची रेलचेल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पौराणिक कथा दर्शवणा-या हलत्या देखाव्यांना भाविकांचा प्रतिसाद वाढत असून पुण्यातील गणेशोत्सव आता रंगत चालला आहे.सायंकाळनंतर सर्व रस्ते गर्दीने फुलू लागले आहेत.


पौराणिक देखावे मांडणारे प्रमुख मंडळ असणा-या खजिना विहीर मंडळाने यावर्षी सीताहरण प्रसंग साकारला आहे. रावणाने सीतेचे अपहरण करून तिला नेताना जटायूने अडवले. रावणाने त्याचे पंख छाटून त्याला जखमी केले, असा प्रसंग मंडळाने मांडला आहे. रावणाची 30 फूटी मूर्ती आणि जटायू असा हलता देखावा भाविकांचे आकर्षण ठरत आहे.
भव्य देखाव्यांची परंपरा जपणा-या टिळक रस्त्यावरील हिराबाग मित्रमंडळाने यंदा राम-रावण युद्धप्रसंगी जखमी झालेल्या लक्ष्मणाला शुद्धीवर आणण्यासाठी संजीवनी वनस्पती आणण्यासाठी हनुमामाने द्रोणागिरी पर्वताकडे उड्डाण केल्याचा हलता देखावा उभारला आहे. सदाशिव पेठेतील हत्ती गणपती मंडळाने जेजुरीच्या खंडोबागडाची प्रतिकृती उभारून पारंपरिक गोंधळाचा जागरही केला आहे. एकूण 18 मूर्तींचा वापर देखाव्यात आहे.