आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुणकारी कढीपत्त्याचे 11 फायदे, केसांसाठी आहे संजीवनी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सामान्यत: कडीपत्त्याचा वापर भारत आणि दक्षिण प्रांतात जास्त केला जातो. परंतु भारतात आता सर्व प्रांतांत याचा वापर होऊ लागला आहे. तुम्हाला वाटत असेल का उपयोग वाढला, तर कारण याच्या असंख्य गुणांमूळे हे आरोग्यासाठी खुप फायदेशीर सिध्द झाले आहे. यामुळे जेव्हाही तुमच्या प्लेटमध्ये कडीपत्ता येईल तेव्ही याच्या कडु चवीमुळे याला बाजुला काढु नका. हे तुमचे केस आणि स्किनसाठी जेवढे महत्त्वाचे आहे तेवढेच इतर आजारांपासुन दूर ठेवण्यासाठी मदत करते. चला तर मग पाहुया या कढीपत्त्याचे फायदे कोण-कोणते आहेत...

1. केसांसाठी संजीवनी
- लोह, ‘क’आणि ‘अ’ जीवनसत्त्व, तसेच आयोडिनचे भरपूर प्रमाण असलेला कढीपत्ता हे स्वयंपाकघरातील एक महाऔषध आहे, असे म्हणता येईल. कढीपत्त्याच्या वापराने पचनसंस्था सुधारता येते. तसेच रुक्ष, गळणाऱ्या केसांसाठी हे संजीवनी ठरू शकते.
- गरजेपेक्षा जास्त केमिकल्सचा वापर आणि प्रदूषणामुळे केसांचं नुकसान होतं. कढीपत्त्यात केसांना निरोगी ठेवणारी तत्त्वे आहेत. या पानांचा बारीक लेप बनवावा. मग तो लेप केसांच्या मुळाशी लावावा.
- कढीपत्त्याची पानेखाल्ल्याने केस काळे, लांब आणि घनदाट होतात. कोंड्याची समस्याही दूर होते.
- वाळलेल्या कढीपत्त्याच्या पानांची पूड करून ती खोबरेल तेलात उकळून घ्यावी. तेल थंड झाल्यावर ते गाळून हवाबंद बाटलीत भरून ठेवावं. झोपण्यापूर्वी हे तेल लावून दुसऱ्या दिवशी नैसर्गिक शांपूने केस धुवावेत.
- कढीपत्त्याची पानंबारीक करून पेस्ट बनवा. त्यात थोडं दही घालून केसांना लावा. आता केस २०-२५ मिनिटं तसेच ठेवा. नंतर शांपूने केस धुवा. हा उपाय नियमित केल्यास केस काळे आणि घनदाट होतील.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन अवश्य जाणुन घ्या गुणकारी कढीपत्त्याचे मोठे 10 फायदे...