आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Delicious recipe : करकरीत कैरीचे तोंडाला पाणी आणणारे कैरीचे15 पदार्थ...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आंबा जसे सर्वांचे आवडते फळ आहे तसेच कैरीही अनेकांना आवडते. जेवणासोबत कैरी खाण्याची तर एक वेगळीच मजा असते. पिंपल्स, उष्मघात, अपचनाची समस्यां यासाठी कैरी एक उपयोगी फळ आहे. शरीरात विटामीन'सी' किंवाविटामीन'ए' चे प्रमाण कमी झाल्यास ते पुन्हा मिळवण्यासाठी कैरी फायदेशीर आहे.
आपण या कैरीचे विविध पदार्थ बनवूनही खाऊ शकतो. आज आपण जाणुन घेणार आहोत कैरीचे विविध पदार्थ... कैरी सॉस,कैरीची कढी, कैरीची चटणी, कैरीचे सरबत, लुंजी, कैरीचे रायते, पन्हे, कैरीचा भात, कैरी डाळ, कैरी सालसा, कैरी टॉपिंग, कैरीची भाजी, सलाड लोणचे...

1. कैरी सॉस
साहित्य

- 1 लहान कैरी
- 1 वाटी साखर
- 8-10 काश्‍मिरी लाल मिरच्या
- 2 टेबल स्पून लसूणपाकळ्या
- मीठ

कृती
- कैरीचं साल काढून घ्या.
- 1 टी स्पून कैरी बारीक चिरा.
- बाकीची चिरून मिक्‍सरवर बारीक करा.
- काश्‍मिरी मिरची अर्धा तास पाण्यात भिजवा. मिक्‍सरवर बारीक करा.
- ललसूण पाकळ्या चिरून ठेचून घ्या. सगळं साहित्य एकत्र करून अर्धा तास झाकून ठेवा.
- अर्ध्या तासाने जाड बुडाच्या पातेल्यात हे मिश्रण घालून मंद गॅसवर शिजायला ठेवा.
- मधे मधे ढवळत रहा. मिश्रण घट्ट वाटलं तर पाव वाटी व्हाइट व्हिनेगर किंवा पाणी घाला. पारदर्शक झालं की गॅस बंद करा.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा झटपट कैरी लोंचाची रेसिपी... कैरीची कढी, कैरीची चटणी, कैरीचे सरबत, लुंजी, कैरीचे रायते, पन्हे, कैरीचा भात, कैरी डाळ, कैरी सालसा, कैरी टॉपिंग, कैरीची भाजी, सलाड लोणचे...