अचानक राग येणे आणि काही सेकंदातच तो शांत होणे. कारण नसताना ओरडणे आणि स्वत:चे फ्रस्ट्रेशन दुस-या व्यक्तीवर काढणे व नंतर पश्चाताप करत बसणे. पण तुम्हाला असा अचानक येणारा राग तुमच्यासाठी स्ट्रेसचे कारण ठरू शकते.
आलेल्या रागातून रिलॅक्स होण्यासाठी अथवा स्ट्रेस कमी करण्यासाठी केवळ जोरजोरात श्वास घेणे किंवा डोळे बंद करणे फायद्याचे ठरते परंतु, आज आम्ही तुम्हाला 15 असे उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही केवळ 5 मिनिटांमध्ये स्ट्रेस फ्री व्हाल.
1- ग्रीन टी प्या - ग्रीन टी हे थियेनिनचे उत्तम स्त्रोत आहे. या केमिकलमुळे आलेला राग कमी होण्यास मदत होते.
2- एक चमचा मध - मधामध्ये मेंदूची गरमी कमी करण्याची क्षमता असते. याच्या सेवनामुळे डिप्रेशन आणि तणावातून आराम मिळतो.
3- आवडते गाणे आठवा - राग आल्यानंतर अथवा स्ट्रेस आल्यानंतर तुम्हाला आवडणारी 5-6 गाणी गुणगुणा असे केल्याने तुम्हाला आलेला राग आणि स्ट्रेस कमी होण्यास नक्कीच मदत होईल.
4- चॉकलेट खा- चॉकलेटच्या सेवनामुळे स्ट्रेस हार्मोन कोर्टिसोलची लेव्हल नियंत्रित राहते. तसेच मेटाबॉलिज्म स्टेबलाइज होते.
5- च्यूइंग गम चावा - केवळ 5 मिनिटे च्यूइंग गम चावल्याने कोर्टिसोल लेव्हल कमी होण्यास मदत होते व तत्काळ स्ट्रेस कमी होतो.
6- उल्टी गिनती- 10,9,8,7,6,5....1। म्हणजे उल्टी मोजणी केल्याने तुमच्या मनावर आलेला ताण आणि राग दोन्ही कमी होण्यास मदत होईल.
7- आंबा खा - लिनालूल नावाचा एक कम्पाउंड आंब्यात उपलब्ध असतो. यामुळे स्ट्रेस लेव्हल कमी होते.
8- उशीवर डोके ठेवल्यास - ताण कमी करण्यासाठी चांगली झोप घेणे आवश्यक असते. राग आल्यानंतर काही काळासाठी उशीवर अथवा कुशनवर डोके ठेऊन पडल्यास हलकेपणा जाणवतो.
Other Tricks: व्हॅकेशनची प्लानिंग, बॉलवर पाय फिरवणे, केसांना ब्रश करा, कडक उन्हात गेल्याने , खिडकीतून काही वेळ बाहेर पाहिल्यास, लिहून पाहणे, सुंदर वास.