( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
दातांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी काही गोष्टींचे पालन करणे गरजेचे असते. असे केल्याने तुमचे दात निरोगी राहण्यास मदत होईल. यासाठी गरजेचे आहे रोजच्या सवयींमध्ये थोडेसे बदल केल्याने दातांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल.
1- बर्फ चावणे- चोखणे
ज्या व्यक्तींना बर्फ किंवा थंड पदार्थ चावायची आणि चोखायची सवय असते, अशा व्यक्तींच्या दातांचे आरोग्य लवकर खराब होण्याची भिती अधिक असते. असे केल्याने दातांमध्ये फ्रॅक्चर होण्याची देखील शक्यता असते. जर तुम्हाला एखादे ड्रिंक प्यायल्यानंतर त्यामध्ये बाकी राहिलेला बर्फ चावायची अथवा चोखायची सवय असेल तर अशी सवय तत्काळ बंद करा. बर्फ चावल्याने दातांमध्ये छोटे-छोटे क्रॅक पडण्यास सुरूवात होते. काही कालावधीनंतर हे क्रॅक्स मोठे होऊन दातांच्या मुळापर्यंत जाण्याची भिती अधिक असते.
काय करावे ?
थंड पदार्थ कमीत कमी वेळ तोंडात ठेवण्याची सवय लावा. तसेच गोड पदार्थ जास्त वेळ चघळत बसू नये.
दातांच्या देखभालीसाठी आणखी काय करावे, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...