आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाचा रवा-स्टॉबेरी खीरची सोपी रेसिपी, पाहा असेच 4 पदार्थ...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवनवीन पदार्थ तयार करुन खाण्याची आवड तुम्हाला देखील आहे ना... खास तुमच्यासाठी आम्ही काही चविष्ट आणि खमंग अशा रेसिपी घेऊन आलो आहोत... आज आपण रवा-स्टॉबेरी खीर, नानकटाई, मावापनीर लाडू, बालूशाही आणि काजूकतलीची सोपी रेसिपी घेऊन आलो आहोत... चला तर मग वाचा रेसिपी आणि झटपट तयार करा हे चविष्ट पदार्थ...

रवा - स्ट्रॉबेरी खीर
साहित्य-
- 750 मिली दूध
- 3 टेबल स्पून रवा
- 1 टेबल स्पून तूप
- 3-4 कप साखर
- काजू-बदामाचे काप -आवडीनुसार
- 15 ते 16 काड्या केसर (१ टेबल स्पून दुधात भिजवून )
- 1-4 टी स्पून वेलची पूड

स्ट्रॉबेरी topping साठी-
- 1 कप बारीक चिरलेली स्ट्रॉबेरी
- 1 टेबल स्पून साखर
- 1-2 टेबल स्पून लिंबाचा रस
- कस्टर्ड पावडर किंवा कॉर्न स्टार्च -१ टी स्पून

कृती -
- एका पातेल्यात दूध उकळण्यास ठेवावे . दुधाला उकळी येईपर्यंत एका पँनमध्ये तूप गरम करावे व रवा किंचित लालसर रंगावर भाजून घ्यावा .
- दुधाला उकळी आल्यावर त्यात भाजलेला रवा घालावा व ढवळून घ्यावे . दूध थोडेसे घट्ट होतेय असे दिसल्यावर त्यात साखर व भिजवलेले केशर घालावे व एकजीव करून घ्यावे . वेलची पूड व काजू-बदामाचे काप घालावेत व खीर थंड करण्यास ठेवावी .
- एका भांड्यात बारीक चिरलेली स्ट्रॉबेरी ,साखर व लिंबाचा रस घालावा व स्ट्रॉबेरी किंचित मऊसर होईपर्यंत शिजवून घ्यावी ,कस्टर्ड पावडर 1 टेबल स्पून पाण्यात मिक्स करावे व स्ट्रॉबेरीत घालून आच बंद करावी
- खीर पूर्णपणे थंड झाल्यावर त्यात वरील स्ट्रॉबेरीचे मिश्रण घालून निट एकजीव करून फ्रीजमध्ये सेट करण्यास ठेवावे किंवा सर्विंग बाउलमध्ये आधी रव्याची खीर टाकावी व वरून स्ट्रॉबेरीचे मिश्रण टाकावे व पिस्त्याच्या काप घालून सजवावे .

टीप-
स्ट्रॉबेरीचे मिश्रण खीर पूर्णपणे थंड झाल्यावरच घालावे .
स्ट्रॉबेरी शिजवून घालायची नसेल तर ,खीर पूर्णपणे थंड झाल्यावर त्यात बारीक चिरलेले स्ट्रॉबेरीचे तुकडे घालावेत व काही वेळ फ्रीजमध्ये सेट करण्यास ठेवावे .
मावा पनीर लाडू रेसिपी आणि अजून काही चविष्ट गोड पदार्थांच्या रेसिपी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...