आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या विकेंडला झटपट तयार करा हे 5 चटपटीत पदार्थ, वाचा रेसिपी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही तरी चटपटीत खायला तर सर्वांनाच आवडते. सुट्टीच्या दिवशी चटपटीत पदार्थ तयार करावा अशी सर्वांचीच इच्छा असते. लहान मुले तर अगदी नवीन पदार्थांची वाट पाहत असतात. प्रत्येक वेळी काही तरी नवीन करावे असे सर्वांना वाटते. यासाठी आज आम्ही मधल्यावेळच्या पदार्थांच्या काही खास रेसिपी घेऊन आलो आहोत. हे पदार्थ लहान मुलांना तर खुपच आवडतात. चला तर मग वाचूया या सोप्या रेसिपी...
रूचकर पापड रोल
साहित्य:
- उडदाचे सहा पापड
- अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा
- अर्धी वाटी उकडलेले मटारदाणे
- अर्धी वाटी नारळ
- अर्धी वाटी बारीक शेव
- काजू, बेदाणे
- ४-५ हिरव्या मिरच्यांचे वाटण
- लिंबुरस, मीठ, साखर
- तळणीसाठी तेल.
कृती :
- मटारदाणे जरासे ठेचून घेउन त्यामध्ये पापड टाकावे.
- सर्व पदार्थ एकत्र करून सारणाचे सहा भाग करावेत.
- एका ताटात पाणी घेऊन सर्व पदार्थ व पापड त्यात ३-४ मिनिटे भिजवून ठेवावेत.
- ते निथळल्यानंतर पोळपाटावर ठेऊन प्रत्येक पापड कोरड्या फडक्याने टिपून घ्यावा.
- त्यावर सारणाचा एक भाग ठेऊन पापड वळकटीप्रमाने दुमडून घ्यावा.
- नंतर थोडासा पाण्याचा हात लावून दोन्ही कडा आतल्या बाजूला वळवून चिकटवाव्यात.
- आता रोल सर्व बाजूंनी बंद होईल.
- नंतर सर्व रोल तयार करून गरम तेलात मंद गॅसवर तळुन घ्यावेत.
- गरमागरम रोल सॉसबरोबर सर्व्ह करावे.
पनीस सँडविच, मसाला खाकरा, स्वीड कॉर्न उपमा आणि सँडवीच, चीली सँडवीच आणि चिझ चीली बॉलची टेस्टी पदार्थांची सोपी रेसिपी जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...