आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गाजर खाल्ल्याने कमी होतो मोतीबिंदूचा धोका, जाणून घ्या हेल्दी EYES साठी फायदेशीर फूड्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)
आकर्षक डोळ्यांमुळे चेह-याचे सौदर्य वाढते. याच डोळ्यांच्या मदतीने आपण निसर्गाने तयार केलेले सौदर्य पाहात असतो. आयुष्यभर डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आणि भविष्यात डोळ्यांची कुठलीच समस्या उद्भवू नये यासाठी त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी डोळ्यांची साफ सफाई, डाएट आणि व्यायाम करणे गरजेचे आहे.

डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी व्हिटॅमिन-ए असणा-या पदार्थांचे सेवन आवश्यक आहे. यामुळे दृष्टी चांगली होण्यास मदत होते. तसेच होणा-या आजारांपासून देखील संरक्षण होते. आपल्या आहाराचा डोळ्यांवर परिणाम होत असतो त्यामुळे आज आम्ही तुम्हाला डोळ्यांशी निगडित असणा-या आहाराची माहिती देत आहोत.

1- गाजर

डोळ्यांची काळजी घेण्यासाठी आणि आरोग्य उत्तम राहण्यासाठी आहारात गाजर खाणे आवश्यक आहे. गाजरामध्ये व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात असते. गाजर हे अ‍ॅन्टी-ऑक्सीडेंट असल्याने डोळ्यांचे सेल्स आणि रेडिकल्स खराब होण्यापासून रक्षण करते. गाजराच्या योग्य सेवनामुळे मोतियाबिंदू आणि तिरळेपणा कमी होतो. याशिवाय गाजरात फायबर आणि पोतॅशियम अधिक प्रमाणात असते. गाजर खाल्ल्याने तुमची डायजेस्टिव सिस्टम उत्तम राहण्यास मदत होते. गाजरामुळे शरिरात वाढणारे कॅन्सर सेल्स कमी करण्याचे काम करते. तुम्ही जर वाढलेले वजन कमी करण्याच्या प्रयत्नात आहात तर रोज गाजराचे सेवन करा. गाजरामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते तसेच यामध्ये फॅट नसते.