आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वजन कमी करताय ना, करु नका या आरोग्यास होणी पोहोचवणा-या चुका...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वजन कमी करण्याच्या घाईमध्ये अनेक वेळा लोक काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. जे आरोग्यासाठी नुकसानकारक असते. अशात विशेषज्ञांच्या सल्ल्याने नियोजन करणे खुप गरजेचे असते. यासाठी लाइफस्टाइल आणि खाण्यापिण्यावर लक्ष देणे खुप गरजेचे आहे. तुम्ही नेहमी वजन कमी करण्याचे नियोजन करत असाल परंतु तुम्ही ते मध्येच सोडून देत असाल. खुप लोक आपल्या लठ्ठपणामुळे चिंतेत असतात, परंतु काळजी करुन काहीच होत नाही, यासाठी तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घेणे आवश्यक आहे. तुमच्या कडून योग्य नियोजन अंबलात आणले जात नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. या ऐवजी तुम्ही तुमच्या काय चुका होतात हे पाहणे गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाची गोष्टी म्हणजे वजन कमी करताना तुमच्या आरोग्याला काही हाणी तर पोहोचत नाही ना, याकडे लक्ष देणे खुप महत्त्वाचे आहे. आज आपण पाहूया की, वजन कमी करताना कोणत्या महत्त्वाच्या चुका टाळल्या पाहिजे...

1. जेवण बंद करु नका
वजन कमी करण्यासाठी जर तुम्ही विचार करत असाल की, अचानक सर्व खाणे-पिणे सोडून डायटिंक करु, तर हे चुकीचे आहे. तुम्हाला माहिती आहे की, डायटिंग खुप नुकसानकारक असते. या उपायाने तुमचे वजन कमी होण्याऐवजी वाढायला लागते. खरेतर दिर्घकाळ कोणीच उपाशी राहू शकत नाही. दिर्घकाळ उपाशी राहिल्याने नंतर आपण खुप खाऊन घेतो आणि हे आरोग्यासाठी खुप नुकसानकारक असते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या वजन कमी करतांना अजुन कोणत्या महत्त्वाच्या चुका टाळाल्या पाहिजे...